Sai Nursing Home Sankhlim  Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: "मुख्यमंत्री राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी बजावतील" राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास

Goa News Updates: साखळीत पद्मिनी स्मृती साई नर्सिंग होमचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Sai Nursing Home Sankhlim, Goa

साखळी: साखळीत सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर) रोजी पद्मिनी स्मृती साई नर्सिंग होमचे उद्घाटन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले. या कर्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, आमदार आणि साई नर्सिंग होमचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, भाजप नेत्या सुलक्षणा सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वर्गीय पद्मिनी सावंत यांच्या स्मृतींना राज्यपालांनी उजाळा दिला. मुख्यमंत्रीचे वडील पांडुरंग सावंत यांचा कार्यक्रमादरम्यान सत्कार केला तसेच नर्सिंग होमला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांना जनतेची साथ आहे व येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. साई नर्सिंग होमच्या माध्यमातून मुख्यमंत्री करीत असलेले काम प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील साई नर्सिंग होमच्या उद्घाटनामुळे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेने आणि राजकीय गुरु माजी मुख्यमंत्री तसेच रक्षामंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेने विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करता येते असे डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत.

राज्यात लवकरच फिजिओथेरेपी, नॅचरोथेरेपी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कौशल्य विकसित केलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत असंही म्हणाले. कौशल्य विकसित झाले तरच रोजगार उपलब्ध होतील, त्यामुळे युवकांनी सतत ध्येय ठेवून मार्गक्रमण करावे आणि नोकरीवर अवलंबून राहू नये, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नुवे घरफोडी प्रकरण! कुख्यात 'पारधी गँग'चा गुंड अर्जुन गायकवाडच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ; अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडणार?

Goa Tourists Manali Trip: मनालीत गोमंतकीय पर्यटकांची मृत्यूशी झुंज! 48 जणांची सुखरुप सुटका; 'श्रीपाद भाऊं’चा मायेचा आधार

Ponda Fish Market: अस्वच्छतेचा कळस! फोंडा मासळी मार्केटमध्ये दुर्गंधी अन् किड्यांचं साम्राज्य; अनागोंदी कारभारावर व्यापाऱ्यांचा संताप

Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT