Luizinho Faleiro

 

Dainik gomantak

गोवा

'दोन वेळा मी कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यास मदत केली', पण...

आजही काँग्रेसची मनस्थिती तशीच आहे, राष्ट्रवादीतही भाजपशी भिडण्याचा दम नाही.

दैनिक गोमन्तक

मडगाव : 2017 आणि 2018 असे दोनवेळा मी गोव्यात काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास मदत केली. मात्र दोन्ही वेळा काँग्रेसने ती हातची घालवली. सरकार स्थापन करण्यापासून गोव्यात भाजपला रोखल्यास केंद्र सरकारकडून आपल्या हातात बेड्या पडतील अशी भीती काही काँग्रेस आमदारांना वाटत होती असा आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज केला.

आज वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाना भाजपला शिंगावर घेण्याची धमकच नव्हती असा आरोप केला.

2017 साली काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले, त्यावेळी मी स्वतः दोन अपक्ष आमदारांना घेऊन काँग्रेसला समर्थन देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी लुईझीन फालेरो (Luisin Falero) यांनी सत्ता स्थापनेची मागणी करण्यासाठी पत्रही तयार केले होते मात्र त्यावेळी दिग्विजय सिंग यांनी फालेरो याना रोखले. यावेळी फालेरो यांनी तुम्ही पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा पण सरकार स्थापन करा असेही दिग्विजय सिंग यांना सांगितले होते. तरीही त्यांनी हे पत्र देण्यास परवानगी दिली नाहीच.

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) आजारी असताना 2018 च्या अखेरीस मी पुन्हा एकदा काँग्रेसला बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आणला. त्यासाठी सरकारला पाठिंबा दिलेल्या पाच आमदारांना मी काँग्रेस सरकारला पाठिंबा देण्यासाठी राजी केले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांना मुख्यमंत्री (CM) करण्याचे ठरले. मात्र 15 दिवस उलटले तरी यासाठी काँग्रेसला पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळत नव्हता. शेवटी मीही काँग्रेसचा नाद सोडून दिला असे चर्चिल म्हणाले.

केंद्रात भाजपचे (BJP) सरकार असल्याने गोव्यात (goa) काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास आपल्या भानगडी वर येतील आणि आपल्या हाताला बेड्या पडतील अशी काँग्रेसच्या (Congress) काही नेत्यांना भीती होती. त्यासाठी त्यांना भाजपशी पंगा घेण्याची इच्छा नव्हती असा आरोप त्यांनी केला.

आजही काँग्रेसची मनस्थिती तशीच आहे. राष्ट्रवादीतही भाजपशी भिडण्याचा दम नाही. याचसाठी आपण तृणमुल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गोव्यात सत्तेवर येणारे आगामी सरकार तृणमुलचेच असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT