Vijay Sardesai Dainik gomantak
गोवा

गोव्यात सागर मित्र भरतीसाठी कोकणी सक्तीची करा : विजय सरदेसाई

राज्य सरकार संदिग्ध भाषा वापरुन पळवाट काढू पाहत असल्याचाही आरोप

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्याच्या मत्स्योद्योग खात्याने 'सागर मित्र' यासाठी जी 24 पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे त्यासाठी कोकणी भाषा सक्तीची केली नसल्याने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तीव्र नापसंती व्यक्त करताना ही पदे भरण्यासाठी कोकणीचे ज्ञान सक्तीचे करा अशी मागणी केली आहे.

या 24 जागा भरण्यासाठी सरकारने जी जाहिरात दिली आहे त्यात कोकणीचा स्पष्ट उल्लेख न करता स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असे म्हटले असून उमेदवार स्थानिक असल्यास चांगले असे म्हटले आहे.

ही अशी संदिग्ध भाषा कशाला असा सवाल करताना तामिळनाडू सरकारने या पदासाठी जाहिरात देताना तमिळ भाषा बोलता येणे गरजेचे असे म्हटले असून कर्नाटक सरकारने ही पूर्ण जाहिरातच कानडीमध्ये प्रसिद्ध केली आहे याकडे विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे.

याउलट गोवा सरकार 'स्थानिक भाषा बोलता येणे आवश्यक असून उमेदवार स्थानिक असल्यास चांगले अशी संदिग्ध भाषा वापरून पळवाट ठेऊ पाहत आहे असा आरोप केला आहे.

अडचणीच्या वेळी स्थानिक मच्छिमार आणि स्थानिकांना मदत मिळावी यासाठी हे सागर मित्र नेमले जात असून त्यांनी त्या खेड्यात राहून काम करायचे आहे. त्यामुळे इतर राज्यांनी या नोकरीसाठी उमेदवार स्थानिक असणे गरजेचे असे म्हटले आहे. मात्र गोव्यात स्थानिक असल्यास चांगले ही भाषा वापरली आहे. या नोकरीसाठी कुणा साखळीच्या उमेदवाराला घेतल्यास तो वेळेवर या मच्छिमराना मदत करण्यास पोहोचणे कठीणच असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

आंध्र प्रदेश सरकारने या नोकऱ्या जाहीर करताना अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास वर्गीयांना तसेच महिलांसाठीही पदे राखीव ठेवली आहेत त्याच धर्तीवर गोवा सरकारने आपल्या भरती नियमात बदल करून या नोकऱ्या मागासवर्गीय व स्थानिक मच्छिमार समाजातील युवकांना मिळाव्यात अशी तजवीज करावी अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT