Traffic jam Panjim Dainik Gomantak
गोवा

Panaji : सरकार आमच्या संयमाचा अंत पाहतेय का? पणजीकरांचा सवाल

कांपाल रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. परंतु आता वाहतूक कोंडी, सर्वत्र सुरू असलेली खोदकाम, खड्डे आदींमुळे पणजीकरांचा संयम सुटत असून सरकारने आता पणजीकरांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशा तीव्र प्रतिक्रिया पणजीकरांकडून व्यक्त होत आहेत.

स्मार्टसिटी अंतर्गत जी कामे सुरू आहेत. त्या मनमानी कारभाराबाबत लोकांत प्रचंड चीड आहे. विकासाच्या नावाखाली सामान्यांची पिळवणूक सुरू असल्याचे मत स्थानिक व्यक्त करत आहेत.

भरदुपारी कांपाल रस्त्यावर डांबरीकरण काम सुरू होते. त्यामुळे वाहन, बसेसना तासंन् तास कोंडीत रहावे लागले. अशी कामे रात्री ७ नंतर रस्ता बंद करूनही करता येतील. यासाठी जनतेला का वेठीस धरले जातेय, असा सवाल लोक करत आहेत.

दीड वर्षांपासून त्रास !

जी-२० च्या काही बैठका गोव्यात होणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना गाडीने सुरळीत प्रवास करता यावा यासाठी सरकार रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात डांबरीकरण करत आहे. परंतु काही तास येणाऱ्या व्यक्तींसाठी रस्ता करत आहेत.

तर गेल्या वर्षे-दीडवर्षांपासून सर्वसामान्य पणजीकरांना जो मनपा व स्मार्ट सिटी कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे होणारा त्रास केव्हा संपणार, असा सवालही पणजीकर करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT