Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: आवश्यक तेथे सुरक्षारक्षक,स्वच्छकांची लवकरच नेमणूक; मुख्यमंत्री सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये सुरक्षारक्षक व स्वच्छक नेमण्यासाठी सरकार योजना तयार करेल. आवश्यक तेथे या महिन्यातच सुरक्षारक्षक व स्वच्छक नेमले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिले. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

शेट म्हणाले, तारापूर येथे असलेल्या विठ्ठल-रखुमाई प्राथमिक विद्यालयात ३०४ विद्यार्थी आहेत. मराठी माध्यमाच्या या विद्यालयासाठी हरित इमारत सरकारने उपलब्ध करून दिली आहे. विद्यालयामध्ये ३२ खोल्या तर २१ स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षक व स्वच्छकांची गरज आहे. हायस्कूलमध्येही ३०० हून अधिक विद्यार्थी आहेत, तेथेही अशा कर्मचाऱ्यांची गरज आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, या शाळांमध्ये सुरक्षारक्षक व स्वच्छक नेमले जातील. यासाठीची योजना तयार केली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरक्षारक्षक व स्वच्छक नेमण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कुडचिरे येथे हायस्कूलमध्ये पुरेशी पटसंख्या आहे. मावळींगे येथील हायस्कूलमध्ये तर महाराष्ट्रातूनही विद्यार्थी शिकायला येतात. केवळ येथे उल्लेख झालेल्या शाळांमध्ये नव्हे तर सरकारी सर्व शाळांमध्ये सुरक्षारक्षक व स्वच्छक पुरवले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accidents: 'गोव्यातील भाजप सरकारने चतुर्थी उत्सवात अंधार पसरवला'; अपघातांवरून पाटकर यांचा घणाघात

Old Goa Church: ओल्ड गोव्याची चर्च उद्या पर्यटकांसाठी बंद!!

Curchorem Roads: जलवाहिनीसाठी पुन्हा रस्ते खोदणार! कुडचडेत होणार रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

SCROLL FOR NEXT