Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शाळा एप्रिलमध्ये सुरू करण्यास तीव्र विरोध! निकष पाळले नाहीत, शिक्षणतज्ज्ञ, पालकांचा संचालनालयावर आरोप

New Academic Year Goa: सिसिल रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने विभागाला निर्णय प्रक्रियेत कोणते निकष पाळले, हे विचारले होते.

Sameer Panditrao

New Education Policy Goa

पणजी: गोवा सरकारने शालेय शिक्षण नियमावली १९८६ च्या नियम २१ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणा आणि एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांकडून तीव्र विरोध होत आहे. शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेताना कोणतेही योग्य निकष पाळले नाहीत, असा गंभीर आरोप सिसिल रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

सिसिल रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने विभागाला निर्णय प्रक्रियेत कोणते निकष पाळले, हे विचारले होते. मात्र, शिक्षण संचालनालयाने कोणतेही निकष न पाळता हा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक किंवा शाळा व्यवस्थापनाशी कोणतीही चर्चा झाली नाही.

रॉड्रिग्ज म्हणाल्या, हवामान खात्यानुसार, २५ मार्च ते २५ मे हा काळ उष्णतेच्या लाटांचा असतो. अशावेळी शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

हरकतींसाठी आज अंतिम संधी; सिसिल

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे शिक्षण संचालनालयाला आता १७ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवाव्या लागल्या आहेत. हा निर्णय घेताना आवश्यक ते निकष पाळले नसल्याने, शासनाच्या गुपचूप निर्णय प्रक्रियेवर न्यायालयाने बोट ठेवले आहे, असे सिसिल रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT