Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Government Scheme: ‘लाडली लक्ष्मी’च्या पैशांचा योग्य पद्धतीने विनियोग व्हायला हवा

लाडली लक्ष्मी योजनेतील पैशांचा योग्य विनियोग व्हावा, असे आवाहन मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Government Scheme: लाडली लक्ष्मी योजनेतील पैशांचा योग्य विनियोग व्हावा, असे आवाहन मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

बांदोडा येथे काल योजनेच्या मंजुरी पत्रांचे वितरण लाभार्थींना देताना ते बोलत होते. यावेळी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक उपस्थित होते.

मंत्री ढवळीकर म्हणाले की, ‘सरकारच्या माध्यमातून लोकांचेच पैसे लोकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न असून मनोहर पर्रीकर यांच्या या योजनेची फलश्रुती आज दिसत आहे.’ स्वागत व प्रास्ताविक मिथिल ढवळीकर यांनी केले.

मार्चपर्यंत साडेतीनशे लाभार्थी...

येत्या मार्चपर्यंत साडेतीनशे लाभार्थींना लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेताना विवाहित महिलांनी हे पैसे आपल्या मातापित्यांना द्यायचे, की स्वतःसाठी ठेवायचे हा निर्णय घ्यायचा आहे.

लग्न झाल्यानंतर लाडली लक्ष्मीचे पैसे पतीच्या हातात देण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी वादही निर्माण झाले आहेत. लाडली लक्ष्मी योजना ही खरे तर मुलींच्या लग्नासाठी मातापित्यांसाठी आहे, त्यामुळे पतींनीही हे पैसे घेणे ठीक नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT