Goa Ram Niwas Dainik Gomantak
गोवा

Goa Ram Niwas: जय श्री राम! गोवा सरकारला अयोध्येत मिळाली जागा, लवकरच उभे राहणार 'राम निवास'

Goa Ram Niwas In Ayodhya:अयोध्येत ‘राम निवास’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी गेल्या वर्षी विधानसभा अधिवेशनात केली होती.

Pramod Yadav

Goa Ram Niwas In Ayodhya

पणजी: गोवा सरकारतर्फे अयोध्येत ‘राम निवास’ उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारला अयोध्येत जागा मिळाली असून, राम निवासाचे काम लवकरच सुरु होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोमंतकीय रामभक्तासांठी अयोध्येत हे हक्काचं निवास असणार आहे.

गोवा सरकारतर्फे अयोध्येत ‘राम निवास’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी गेल्या वर्षी विधानसभा अधिवेशनात केली होती. राम निवासासाठी उत्तर प्रदेश सरकार ४ हजार चौ. मी. जमीन देणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, घोषणेनुसार सरकारने अयोध्येत जागा घेतल्याची आनंदवार्ता मुख्यमंत्री सावंत यांनी रामभक्तांना दिली आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा सरकार अयोध्येत राम निवास उभारत आहे. येथे रामभक्तांना निवासासाठी हक्काची जागा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश आवास अवाम विकास परिषद आणि उत्तर प्रदेश सरकारचे आभार मानले आहेत. यामुळे परशुराम भूमी गोवा आणि अयोध्या यांच्यात धार्मिक, भक्तीचा बंध आणखी दृढ होणार असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT