Honda Bus stand  Dainik Gomantak
गोवा

होंडा बसस्थानकाकडे सरकारचे दुर्लक्ष; बसस्थानकाची दुर्दशा संपेना

गळतीची समस्या कायम,पत्रे उडून गेले, दरवाजे ही झाले जीर्ण

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या जवळ असलेल्या बहुउद्देशीय अशा बसस्थानका कडे सरकारांचे पुर्ण पणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी बांधलेल्या या बसस्टँडला उतरती कळा लागली आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या बसस्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

बसस्थानकाची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करावी अशी मागणी येथील व्यवसायिक गाळे धारकांनी लेखी निवेदन सादर करून कंदबा महामंडळाकडे केली आहे. तर या निवेदनाची प्रत स्थानिक आमदार डॉ. दिव्या राणे यांना देण्यात आली असल्याची माहिती मधुकर देसाई यांनी दिली आहे.

होंडा हे सत्तरीचे प्रवेशद्वार असून या ठिकाणी विविध प्रकारच्या साधन सुविधांची उभारणी करताना येथे पंधरा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी बसस्थानक बांधण्यात आला होता. त्यामुळे येथील प्रवाशांना सोयीचे होतानाच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी दोन्ही बाजूंनी व्यवसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. परंतू सदर बसस्थानकावर बसेस येण्यासाठी योग्य पर्यायाची निवड न झाल्याने या ठिकाणी हव्या त्या प्रमाणात बसेस येत नाही.

त्याच प्रमाणे सुरवातीच्या काळातच बसस्थानकाच्या छप्परावरील पत्रे योग्य प्रकारे घातले नसल्याने या स्थानकाला पहिल्याच पावसात गळती लागली होती. त्यावेळी काही प्रमाणात दुरुस्ती करून डागडुजी केली होती. परंतू त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून गळती सुरू आहे. त्यामूळे रंगरंगोटी खराब होताना, लाकडी दरवाजे, खिडक्या, तसेच गाळ्यांचे शॅटर सुद्धा खराब झाले आहेत.

त्यामुळे प्रवासी कमी प्रमाणात येत असले तरी कसा बसा आपला व्यवसाय सांभाळून ठेवलेल्या गाळेधारकासमोर समस्या निर्माण झाली आहे. त्यात होंडा पंचायतीचा कारभार या बसस्थानकाच्या एका खोलीत चालत असल्याने पंचायतीला याचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्याची दखल घेऊन येथिल सुमारे 13 गाळे धारकांनी तसेच होंडा पंचायत यांच्याने सह्या करून कदंबा महामंडळाला निवेदन सादर केले आहे.

पावसाळ्यापूर्वी छप्पराची दुरुस्ती करावी, वाळपई ते पणजी मार्गावर धावणाऱ्या बसेस स्थानकावर आणाव्यात, त्याच प्रमाणे बस स्थानकाच्या समोरील भागात स्कूल बसेस उभ्या करून ठेवत असल्याने ग्राहकांना येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्या बसेस तेथे उभ्या करण्यास मनाई करणे अशा स्वरूपाची मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT