Mopa Link road  Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोडसाठी सरकारने अधिकाराचा केला गैरवापर

एल्विस गोम्स यांचे टीकास्त्र: पंचायतीच्या नोटिशीला स्थगिती बेकायदेशीर

दैनिक गोमन्तक

मोरजी: वारखंड पंचायतीने मोपा लिंक रोडचे काम बंद करण्याच्या दिलेल्या नोटीशीला पंचायत संचानालयाने दिलेली स्थगिती बेकायदेशीर असून खुलेआम काम करण्याचाच तो आदेश आहे,असे सांगून मोपा लिंक रोडसाठी सरकारने अधिकाराचा गैरवापर केला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी सोडले. तुळसकरवाडी येथे शुक्रवारी मोपा पीडित शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मोपा पीडित शेतकऱ्यांना सर्व स्तरातून पाठिंबा द्यायला हवा, केवळ एका राजकीय पक्षाचा हा विषय नसून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही गोम्स यांनी केले.

गोम्स म्हणाले,की मोपा विमानतळामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, सध्या लिंक रोड केला जात आहे, तो मोपा विमानतळाच्या आराखड्यात नाही. लोकांच्या कोणत्या जमिनी रस्त्यासाठी घेतल्या त्याचे रेखांकन कुठेही घटनास्थळी दिसत नाही.

मोपा लिंक रोडसाठी अडथळा ठरणारी सर्व लाखो झाडे 3 रोजीपर्यंत कापून टाकली. आता रस्ता खोदकाम सध्या जोरात चालू आहे. तर सुकेकुळण धारगळ येथे उड्डाणपूल लिंक जोड रस्त्याचे खोदकाम सुरू आहे.

वारखंड पंचायतीच्या नोटिसीला स्थगिती कुणाच्या भल्यासाठी दिली ?

मोपा लिंक रोड चे काम बंद ठेवावे आणि कंपनीकडे कोणती कायदेशीर कागदपत्रे आहेत, ती पंचायतीला सादर करावीत, अशी नोटीस आणि काम बंद करण्याची नोटीस वारखंड पंचायतीने कंपनीला दिली होती, त्या कंपनीने पंचायत संचालनालयात या नोटीशीला आव्हान देऊन स्थगिती मिळवली आहे. याविषयी एल्विस गोम्स म्हणाले,की पंचायतीच्या नोटीशीला तब्बल 15 दिवस स्थगिती देऊन अधिकाऱ्याएकप्रकारे बेकायदा काम करण्याचाच आदेश दिला. त्या अधिकाऱ्याने सरकारच्या दबावाखाली हा आदेश दिला आहे, असा दावा करून आता न्यायालयात दाद मागावी लागेल, असे गोम्स म्हणाले.

वारखंड पंचायतीच्या नोटीसला पंचायत संचानालयाने जी स्थगिती दिली ती योग्य नाही. अधिकारी एका बाजूने म्हणतात 15 ऑगस्टला विमान उडवायचे आहे, म्हणून रस्त्यासाठी घाई. तर दुसऱ्या बाजूने मोपा विमानतळ आणि लिंक रोडचा काही संबध नसल्याचे म्हणतात,हा दुटप्पीपणा आहे. हे सरकार जनविरोधी असल्याने आता न्यायालयच आम्हाला योग्य तो न्याय देईल.

-संदीप कांबळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

SCROLL FOR NEXT