Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Election: भाजप वैफल्यग्रस्त अवस्थेत

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात मतदारांचा कौल काँग्रेसकडे असल्याने तसेच वातावरण पोषक असल्याने भाजपला पराभव दिसू लागल्याने काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला खोडा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेचा भाजप वापर करत असल्याचा आरोप काँग्रेस व गोवा फॉरवर्डने काल केला. काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर आणि गोवा फॉरवर्डचे संघटनमंत्री दुर्गादास कामत यांनी युती झाल्यानंतर पहिल्यांदाच पणजीत आज संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली आणि या दोन्ही युती पक्षांविरोधामध्ये सरकारी यंत्रणेचा वापर केल्यास भाजपला Goa Bjp न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. (Government machinery is being misused against opposition Candidates for Goa Election)

यावेळी बोलताना सुनील कवठणकर म्हणाले की, भाजप विरोधकांना प्रचारापासून परावृत्त करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरत असल्याने लोकशाहीचे सार धोक्यात आले आहे. लोकशाहीत सर्वांना समान हक्क आहे, मात्र भाजप विरोधकांना त्रास देत आहे. भाजप नेते मात्र दहाहून अधिक समर्थकांसह प्रचार करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्ही सर्व नियमांचे पालन करून प्रचार केला तरीही भाजप सरकार केवळ काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या Goa Forward उमेदवारांना त्रास देण्याचा व खोट्या तक्रारी दाखल करून सतावणूक करण्याचा सपाटा सुरू केला आहे. काँग्रेसला जो लोकांकडून पाठींबा मिळत आहे तो बघून भाजप वैफल्यग्रस्त होत आहे. सध्या भाजप निराशेच्या स्थितीत आहे आणि म्हणूनच ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याची टीका त्यांनी केली.

राज्यात काँग्रेस Goa Congress आणि गोवा फॉरवर्डचे युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना न्यायालयासामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री आपल्या अधिकाराचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देत आहेत. आम्ही शांत बसणार नाही, तर भाजपच्या कृतीविरोधात दिल्ली येथील निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे संघटन सचिव दुर्गादास कामत यांनी सांगून ते म्हणाले, सरकारी अधिकारी हे सरकारचे बाहुले बनले असून भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की भाजपचा पराभव होईल आणि गोवा फॉरवर्डसह काँग्रेस पुढील सरकार स्थापन करेल. त्यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम करणे थांबवावे, असे कामत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT