Goa: John Nazareth.
Goa: John Nazareth. Dainik Gomantak
गोवा

Goa: सरकारकडून ‘जॉब गेट स्कॅम’ : गोवा फॉरवर्ड

Vilas Mahadik

पणजी : सरकारी नोकऱ्यांसाठी (Government Jobs In Goa) मी नव्हे पण काही आमदार पैसे घेत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Dept. CM Chandrakant (Babu) Kavlekar) यांनी केल्याने भाजप सरकारमध्ये पैसे घेऊन नोकऱ्यांचा लिलाव सुरू असल्याचे सिद्ध होत आहे. सध्‍या सरकारकडून ‘जॉब गेट स्कॅम’ सुरू असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे संयुक्त सचिव व प्रवक्ते जॉन नाझारेथ यांनी केली.

भाजपच्या एका कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी इतर आमदारांप्रमाणे मी पैसे घेत नाही, असे सांगितले होते. त्यांनी कोणते आमदार पैसे घेतात याचे स्पष्टीकरण करायला हवे होते. सध्या राज्यात पोलिस खात्यात असलेल्या विविध पदाच्या नोकऱ्यांसाठी पदानुसार पैशांचा ‘मेन्‍यू’ तयार करण्यात आला आहे. यावरून आमदार पैसे घेत आहेत असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट होते. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधान केले होते, की त्यांच्या नावाने काही खात्यांमध्ये नोकऱ्यांसाठी पैसे घेतले जात आहेत. त्यांच्या व कवळेकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्ष हा भ्रष्टाचारी असल्याचे स्पष्ट होते, असेही नाझारेथ म्हणाले.

कवळेकर यांच्‍या विधानाची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही नाझारेथ यांनी केली. विविध खात्यांतील रिक्त पदे गोवा राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता व त्यासाठी आयोगही स्थापन करण्यात आला. मात्र, त्याला काही मंत्री व आमदारांनी विरोध केल्याने ही रिक्त पदे संबंधित खात्यामार्फत भरण्यात येत आहेत. यावरून लोकांना कळून चुकले आहे, की हे सरकार किती पारदर्शक आहे. नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन ही निवड प्रक्रिया निवडणुकीपर्यंत लांबवायची. जमा केलेल्या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करायचा आणि निवडणुकीनंतर नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन देण्याची या सरकारची चाल आहे. लोकांनी यापासून सावध राहण्याचे आवाहनही नाझारेथ यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

SCROLL FOR NEXT