Goa Govenment Jobs Exam 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Government Jobs: कनिष्ठ लिपिक पदाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; तारखा जाणून घ्या

Goa Clerk Posts Exam: परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना ३ जानेवारीपासून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून परीक्षा केंद्राचा तपशील उपलब्ध करून दिला जाईल

Akshata Chhatre

Goa Government Clerk Posts Recruitment Exam

पणजी : राज्य कर्मचारी भरती आयोगाने कनिष्ठ श्रेणी लिपिक पदांच्या २३२ जागा भरण्यासाठी संगणकावर आधारित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा ११ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत एकूण सात टप्प्यांत घेतली जाणार आहे. महत्वाची बाब प्रत्येक टप्पा संपल्यानंतर त्याच टप्प्याचा निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे.

ही परीक्षा ११, १२, १८, १९ आणि २५ जानेवारी तसेच १ व २ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाईल. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना ३ जानेवारीपासून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून परीक्षा केंद्राचा तपशील उपलब्ध करून दिला जाईल.

कनिष्ठ श्रेणी लिपिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया संगणक आधारित परीक्षेद्वारे अधिक पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने राबविण्याचा आयोगाचा उद्देश आहे. सात टप्प्यांमध्ये सदर परीक्षा घेतल्याने उमेदवारांना व्यवस्थापित करणं सोपं होणार आहे. तसंच, याचे निर्णय देखील जलदगतीने जाहीर करण्यात येणार असल्याने उमेदवारांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT