Amit Patkar With Taxi Operators Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : गोव्याबाहेरून टॅक्सी ऑपरेटर आणण्याचा भाजपचा छुपा अजेंडा; अमित पाटकरांचा भाजपावर आरोप

काँग्रेस नेत्यांनी आंदोलक टॅक्सी ऑपरेटरची भेट घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याबाहेरून अ‍ॅप आधारित टॅक्सी ऑपरेटर आणण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्यानेच स्थानिक टॅक्सी चालकांना काउंटर देण्यास सरकार विलंब करत आहे. यावरुनच भाजप सरकार गोव्यातील प्रमुख सार्वजनिक सेवा क्रोनी कॅपिटलिस्टच्या हाती सोपवण्याच्या तयारीत आहे हे स्पष्ट होत आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

पाटकारांनी “टूगेदर फॉर मोपा एअरपोर्ट” या बॅनरखाली मोपा विमानतळावरील आंदोलक टॅक्सी ऑपरेटरची भेट घेतली. काँग्रेसचे नेते अ‍ॅड. जितेंद्र गावकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, विजय भिके आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या टॅक्सी चालकांना पाठिंबा दिला.

राज्यात ओला, उबेर आणण्याच्या परिवहन मंत्री गुदिन्हो यांनी केलेल्या विधानाची जनतेला आठवण करून देताना अमित पाटकर म्हणाले, भाजप सरकारचे दोन मंत्री गोव्याबाहेरील व्यावसायिकांना हाताशी धरुन अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून मला माहिती मिळाली आहे.

काँग्रेस पक्षाने नेहमीच गोव्यातील जनतेच्या भावनांचा आदर केला आहे. आमच्या काँग्रेस सरकारने भूतकाळात गोमंतकीयांच्या मागणीवरून तीन सेझ आणि प्रादेशिक आराखडा रद्द केला, असे अमित पाटकर म्हणाले.

सरकारने स्थानिक टॅक्सी चालकांबद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. मोपा विमानतळासाठी पेडणे तालुक्यातील जनतेने खुप मोठा त्याग केला असून, त्यांना प्रशासनाने प्राधान्याने सहकार्य दिले पाहिजे, असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT