Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : कासरपाल संदीपक शाळेसंदर्भातील आरोप तथ्यहीन : डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : लोकशाहीमुळे प्रत्येकाला बोलण्याचा आणि आरोप करण्याचा अधिकार आहे. म्हणून काही अर्थहीन आरोप करणे योग्य नव्हे. असेही डॉ. शेट्ये म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, कासारपाल येथील संदीपक शाळेसंदर्भातील माजी आमदार नरेश सावळ यांनी माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत, असे स्पष्टीकरण आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी करुन आरोप करताना सावळ यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरलीय, ती अशोभनीय आहे.

असे म्हटले आहे. लोकशाहीमुळे प्रत्येकाला बोलण्याचा आणि आरोप करण्याचा अधिकार आहे. म्हणून काही अर्थहीन आरोप करणे योग्य नव्हे. असेही डॉ. शेट्ये म्हणाले.

कासारपाल येथील संदिपक शाळा बंद करण्यासाठी आमदार डॉ. शेट्ये कार्यरत असून, त्यांनी शाळेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गासह उच्च माध्यमिक विभागाच्या परवानगीत ''खो'' घातला आहे. असा आरोप माजी नरेश सावळ यांनी काल (शनिवारी) पत्रकार परिषदेत केला आहे.

सावळ यांनी हा आरोप करतानाच, डॉ. शेट्ये यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली आहे. यासंदर्भात आज (रविवारी) डॉ. शेट्ये यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी आपले म्हणणे मांडले.

कायदेशीर सल्ल्यानंतर भाष्य

नरेश सावळ यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर लगेचच माझ्यावरील आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येईल. पुढील भूमिकाही स्पष्ट करण्यात येईल. असे डॉ. शेट्ये यांनी सांगून, शाळांना नवीन वर्गांना परवानगी द्यायची की नाही. तो निर्णय शिक्षण खात्यावर अवलंबून असतो. असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Soham Naik: 'सोहम नाईक'च्‍या अडचणी वाढल्‍या! सज्ञान महिलेसह 5 FIR दाखल; जामीन मिळणे झाले अवघड

Rashi Bhavishya: भाग्योदय होणार! मार्च एंडिंग ठरणार 'या' राशींसाठी खास; आर्थिक स्थितीत होणार बदल

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT