Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Panaji News : गोमन्तक टीव्हीवरील ‘तोणयामेळ'' या कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी ताळगाव पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत सहभागी वरील द्वयींशी चर्चा केली.
Cecil Rodrigues and Francis Cuelho
Cecil Rodrigues and Francis CuelhoDainik Gomantak

Panaji News :

पणजी, जानू रुझारिओ, आग्नेल डिकुन्हा, सिडनी बार्रेटो हे वारंवार निवडून येतात. परंतु पंचायतीत आमदार बाबूश सांगतील तेच त्यांना करावे लागते.

येथे निवडून येणारे पंचसदस्य हे केवळ रबरस्टँप म्हणून आमदारांना हवे असतात, असा आरोप ‘ताळगावकर युनायटेड'चे सिसील रॉड्रिग्स व फ्रान्सिस कुएल्हो यांनी केला.

गोमन्तक टीव्हीवरील ‘तोणयामेळ'' या कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी ताळगाव पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत सहभागी वरील द्वयींशी चर्चा केली.

बाबूश गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले, यातील तीन उमेदवारांना कशाप्रकारे अर्ज मागे घ्यावा लागला, याची तपशीलवार कुएल्हो यांनी माहिती दिली. लोकांना धमकावून, भीती घालून सत्ता आपल्या हाती ठेवण्याचे काम मोन्सेरात यांनी केले आहे.

आम्ही आजपर्यंत त्यांच्याविरोधात आवाज उठवीत आलो आहोत. प्रभाग एकमध्ये २३ वर्षी डिप्लोमा इंजिनिअर झालेल्या उमेदवाराला अर्ज कशाप्रकारे मागे घेण्यास लावला, याविषयी सीसील सांगतात, जिल्हा पंचायत संदस्या अंजली नाईक त्या उमेदवाराच्या घरी जाऊन बसल्या होत्या, त्यानंतर त्याच्या आईने त्याला अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यापेक्षाही प्रतिमा शिरोडकर यांना कशाप्रकारे अर्ज मागे घ्यावा लागला, हेही त्यांनी विशद केले.

बाबूश मोन्सेरात यांना सर्वजण बिनविरोध निवडून आलेले हवेत, लोक जर निवडणूक रिंगणात उभे आहेत, तर त्यांच्याविरोधात लढत देऊन त्यांच्या सदस्याला जिंकून यायला काय हरकत आहे. जर बाबूश यांना खरोखर या पंचायतक्षेत्रात लोक मानत असतील, तर कोणताही पूर्वग्रह न बाळगता म्हणजेच निष्पक्ष लढत होऊन द्यावी, असे सांगत कुएल्हो सांगतात. बाबूश यांना जर विजयाची एवढी खात्री आहे, तर मग त्यांना लोकसभेचा भाजपचा प्रचार सोडून पंचायत निवडणुकीसाठी का फिरावे लागत आहे? असा सवालही त्यांनी केला.

आजही ताळगावात पाणी, शौचालय, रस्त्याच्या समस्या आहेत. हनुमाननगर म्हणून असलेल्या भागात नळाला पाणी येत नाही. याठिकाणी दीडशे लोकांसाठी एक शौचालय आहे, अशी स्थिती आहे.

जे लोक स्थलांतर होऊन ताळगाव परिसरात राहिले आहेत, ती मते त्यांनाच पडतात. मते पडली नाहीत तर त्यांची सतावणूक केली जाते, असे सिसील यांनी सांगितले.

सिसील म्हणाल्या की, ताळगाव पंचायत श्रीमंत आहे. ग्रामसभेत लोकांना सहभागी करून घेतले जात नाही, ग्रामसभेची माहितीही पोहोचविली जात नाही. त्यांना ग्रामसभेला लोक आलेले नको असते. ग्रामसभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची अट आहे, पण ही अटही काहीवेळा पाळली जात नाही.

त्याशिवाय ग्रामसभेत मांडलेल्या समस्यांकडे सत्तेवरील पंचायत मंडळ गांभीर्याने पाहत नसल्याचे त्यांनी पटवून दिले. आम्ही निवडणुकीसाठी पुढे आलो म्हणून सर्व पक्षातील लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला.

लोक आमच्या निर्णयाचे स्वागत करीत आहेत, आमचे सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी चार ठिकाणी ‘ताळगावकर युनायटेड''चे उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास सिसील व कुएल्हो यांनी व्यक्त केला.

Cecil Rodrigues and Francis Cuelho
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण करणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

मोन्सेरात यांच्याकडून चर्चेला नकार!

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे ताळगाव पंचायत निवडणुकीविषयी चर्चेसाठी कोणी व्यक्ती पाठवावी, अशी विनंती ‘गोमन्तक''ने केली होती, परंतु त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट'ची बाजू समजून घेता आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com