Dengue  Dainik Gomantak
गोवा

डेंग्यू रोखण्यास सरकारची आरोग्य यंत्रणा सज्ज: विश्वजित राणे

पालिका, पंचायतींना सूचना

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात डेंग्यूची लागण सुरू झाल्याने तसेच पावसाळा येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याने राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा सक्रीय झाली आहे. पालिका व पंचायतींबरोबरच आरोग्य खात्यालाही डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक ती तत्परतेने पावले उचलण्याचे निर्देश व सूचना आरोग्य खात्यातर्फे दिले आहेत.

यासंदर्भात आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, डेंग्यूचा प्रसार राज्यात पसरू नये म्हणून आरोग्य खात्यातर्फे पंचायती व पालिकांच्या अधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून व चर्चा करून त्यावर उपाय काढण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. डेग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने त्यावर योग्यवेळी नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खात्याचे अधिकारी कामाला लागले आहेत. डेंग्यूच्या प्रसारावर त्वरित त्यावर नियंत्रण आणण्यासाठी देखरेख यंत्रणा गरजेची आहे. त्याचा प्रसार फोफावत गेल्यास तो आटोक्यात आणण्यास आरोग्य यंत्रणेला बरेच परिश्रम करण्याची गरज भासू शकते. ते टाळण्यासाठी आताच पावले उचलण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत, असेही आरोग्यमंत्री राणे म्हणाले.

हल्लीच सत्तरी तालुक्यातील विविध भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यावेळी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी भागात जाऊन तेथील परिसराची तसेच लोकांची तपासणी केली होती. काही परिसरात पाणी टंचाईमुळे पिंपामध्ये पाणी साठवून ठेवले जात होते व ते पाणी आठवड्यापूर्वीचे असल्याने डेंग्यू पैदास होण्यास मदत होत असल्याचे आढळून आले होते. काही ठिकाणी पाणी साठलेले होते तेथेही ही साथ पसरण्याची शक्यता असल्याने लोकांना पाणी जास्त दिवस साठवून न ठेवण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले होते.

लोकांनी काळजी घ्यावी...

पावसाळा जवळ आल्यावर मलेरिया व डेंग्यू यासारख्या साथीची लागण त्वरित सुरू होते. त्यामुळे या साथीपासून दूर राहण्यासाठी लोकांनी आवश्‍यक ती काळजी घेण्याची गरज आहे. पाणी साठून राहणाऱ्या वस्तू घराच्या सभोवती असू नयेत. शुद्ध व ताज्या पाण्यात डेंग्यूची पैदास होत नाही मात्र काही दिवस ते पाणी तसेच राहिल्यास लोकांना डेंग्यूचा आचार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लोकांनी पाणी जास्त दिवस साठा करून ठेवू नये असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT