Pernem scrap yard  Danik Gomantak
गोवा

पर्यटन खात्याने पेडण्यात बनवला सरकारी स्क्रॅप अड्डा

खाजगी कंपनीला पेट्रोल पंप उभारण्यासाठी दिली जागा

दैनिक गोमन्तक

गोवा पर्यटन खात्याने सध्या पेडणे मालपे गोवा दरबारच्या परिसरात सरकारी स्क्रॅप अड्डा बनवला आहे. त्यावर त्वरित उपाययोजना करून या परिसरातील स्क्रॅप अड्डा हलवावा आणि त्या ठिकाणी एखादा चांगला हॉटेल प्रकल्प उभारून स्थानिकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. गोवा सरकारने पेडणे तालुक्यातील मालपे विर्नोडा पंचायत क्षेत्रातील आणि राष्ट्रीय महामार्ग 66 च्या नजीक शिवाय रेल्वे स्टेशनच्या समोर पर्यटन खात्याने स्थानिकांच्या शेत जमिनी घेऊन त्या ठिकाणी पर्यटन खाते अंतर्गत हॉटेल प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती. (The government has set up a government scrap yard in Pernem)

हॉटेल गोवा दरबार एक छोटेखानी हॉटेल उभारून व्यवसाय सुरू करण्यात आला होता. मात्र मागच्या दहा वर्षापासून या परिसराला सरकारच्या पर्यटन खात्याकडून सरकारी स्क्रॅप अड्डा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारने यातील काही जागा एका खाजगी कंपनीला पेट्रोल पंप उभारण्यासाठी दिलेली आहे.

परंतु, या ठिकाणी एखादे तारांकित हॉटेल उभारले असते तर नागरिकांची पर्यटकांची सोय झाली असती, शिवाय लहान मोठे रोजगार उपलब्ध झाले असते. तेही न उभारता सरकारने मागच्या दहा पंधरा वर्षापासून या जागेकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ पर्यटन खात्याचे याठिकाणी मोडकळीस आलेल्या बोटी, वाहने स्क्रॅप म्हणून या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सरकारने ही जागा चांगल्या एखाद्या प्रकल्पासाठी उपयोगात आणावी अशी नागरिकांची मागणी आहे.

मागची कित्येक वर्षे पेडणे तालुक्यातील कलाकार या ठिकाणी कलाभवन व्हावे अशी मागणी करतात. परंतु, सरकारला आज पर्यंत यश आले नाही. शिवाय या गोवा दरबारच्या ठिकाणी तालुक्याचे अग्निशामन दलाचे कार्यालय उभारले किंवा त्यांनाही दिली असती तर चांगल्या प्रकारची सोय झाली असती. तसेही सरकारने केले नाही. मालपे येथे पर्यटन खात्याचे हॉटेल गोवा दरबार एका चांगल्या जागी आहे. रोहन खंवटे आणि पेडणेचे प्रवीण आर्लेकर या दोघांनीही हातात हात घालून या परिसराचा पर्यटन नजरेतून विकास करावा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यावर लक्ष द्यावे, अशी मागणी विर्नोडा माजी सरपंच वकील सीताराम परब व नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT