Mahadayi Water Dispute  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी विरोधकांच्या पदरी निराशाच, वाढीव दिवसाला नकार

विरोधकांकडून अध्यक्षांकडे केलेला पत्र्यव्यवहार ठरला फोल

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 ते 19 जानेवारीपासून होणार आहे. सध्या गाजत असलेल्या म्हदई प्रश्नावरून राज्यात मोठे राजकीय घडामोडी घडत आहेत. अधिवेशनात म्हादईच्या विषयावर चर्चेसाठी संपूर्ण एक दिवस ठेवावा अशी मागणी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्षासह इतर पक्षाच्या आमदारांनी केली आहे. याबाबत त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सोमवारी वेगवेगळी पत्रे सादर केली. काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सोमवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षांना पत्र सादर केले.

दरम्यान, म्हादईच्या विषयावर अधिवेशनात चर्चेसाठी अतिरिक्त दिवसाच्या मागणीला बीएसी बैठकीने नकार दिला आहे. गुरुवारी अधिवेशनाच्या उत्तरार्धात या विषयावर चर्चा होईल असे आपचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास यांनी म्हटले आहे.

"सभापती रमेश तवडकर यांना निवेदन सादर केले आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यासाठी तसेच, म्हादई आणि गोव्याशी संबंधित समस्या मांडण्याच्या संधी नेत्यांना द्यावी." अशी मागणी विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी केली आहे.

तर, "म्हादईचा मुद्दा आज गोव्यात सर्वात ज्वलंत मुद्दा झाला आहे आणि तो आपल्या राज्याच्या भविष्याची चिंता वाढवणारा आहे. गोव्यातील लोक घाबरलेले आहेत, त्यांना या संपूर्ण प्रकरणाचे सत्य आणि म्हादईला वाचवण्यासाठी सरकारची रणनिती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे सरदेसाई यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

"लोकांचा आवाज उठवण्यासाठीच नव्हे तर आपल्या सभागृहाचे पावित्र्य राखण्यासाठी मागील अधिवेशनात गमावलेले पंधरा दिवस या अधिवेशनात वाढवून घ्यावेत. म्हादई प्रश्नावर विशेष चर्चेसाठी अधिवेशनात किमान एक पूर्ण दिवस देण्यात यावा. म्हादईप्रश्नी समस्येवर सरकारने विचार केलेल्या उपायांची सर्व तथ्ये आणि आकडेवारी यावेळी नोंदवली जावी. अधिवेशन शुक्रवारपर्यंत वाढवून बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करावा." अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT