Press Conference 

Bridge 

 

Dainik Gomantak 

गोवा

चोडण पुलाबाबतची सरकारी घोषणा फसवी: काँग्रेसचे ऍड. प्रभूगावकर यांचा दावा

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऍड. अजय प्रभूगावकर यांनी सोमवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पु लाबाबत दिली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: चोडण पुलाबाबतीत सरकारची घोषणा फसवी आहे. या पुलासाठी अद्यापही आवश्यक भू-संपादन करण्यात आलेले नाही. माहिती हक्क कायद्या अंतर्गत उपलब्ध झालेल्या माहितीवरुन हे स्पष्ट होत आहे,अशी माहिती मये मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऍड. अजय प्रभूगावकर यांनी सोमवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मये गट काँग्रेसचे अध्यक्ष राजेश गावकर दिलीप गावस, विनोद धुरी आणि रूपा हरिजन उपस्थित होते.

विकासाच्या बाबतीत भाजप (BJP) सरकारकडून बढाया मारण्यात येत असल्या, तरी या बढाया म्हणजेच जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मये आणि डिचोलीवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला चोडण पूल. एकाबाजूने या पुलासाठी (Bridge) आवश्यक भू-संपादन प्रक्रिया करण्यात आली असून, पुलाच्या कामाला लवकरच चालना मिळणार असल्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूने या पुलासाठी मुळात आवश्यक भू-संपादनच अद्याप करण्यात आलेले नाही. माहिती हक्क कायद्या अंतर्गत आपणाला मिळालेल्या माहितीवरून हा प्रकार उघड झाला आहे. असे ऍड. अजय प्रभूगावकर यांनी सांगून चोडण पुलाबाबतीत प्रत्येकवेळी जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

विकासकामांबाबतीत मये मतदारसंघ दुर्लक्षित राहिलेला आहे. केवळ आश्वासना व्यतिरिक्त काहीच पदरी पडलेले नाही. खाणीच्या रॉयल्टीतून मये मतदारसंघात भरीव विकासकामे करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. रोजगाराबाबतीतही (Employment) मये मतदारसंघावर अन्याय झाला असल्याचा दावा ऍड. प्रभूगावकर यांनी केला. भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली असून, यावेळी जनतेला परिवर्तन हवे आहे, असे दिलीप गावस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT