भाजप अलोकतांत्रिक मार्गाने सरकार चालवतयं : दिगंबर कामत

सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा आणि जनता व सरकार मधील संवाद तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘ हे सरकार अलोकशाही पद्धतीने काम करत आहे.’’ असे कामत (Digambar Kamat) म्हणाले.
Digambar Kamat

Digambar Kamat

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: नोकऱ्या घोटाळ्याच्या निषेधार्थ काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला रोखण्याच्या भाजप सरकारच्या (BJP government) कृतीचा निषेध करताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी सोमवारी सांगितले की, हे सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा आणि जनता व सरकार मधील संवाद तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘ हे सरकार अलोकशाही पद्धतीने काम करत आहे.’’ असे कामत म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Digambar Kamat</p></div>
केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा गोव्यात दाखल !

काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह कार्यालयापासून मोर्चा काढला. तिथे त्यांना आझाद मैदानाकडे रोखण्यास आले. नंतर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ आल्तिन्हो येथे रोखण्यात आले. जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, काँग्रेस युवा अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, बिना नाईक, युरी आलेमाव, रुडोल्फ फर्नांडीस, राजेश फळदेसाई आदी या वेळी उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यापासून रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्ताचा वापर करण्यात आला. मात्र, नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून निवेदन स्वीकारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com