South Western Railway Dainik Gomantak
गोवा

सोनावळी ते दूधसागर दरम्यान रेल्वे मार्ग पूर्णतः खराब; दुरुस्तीसाठी वेळ लागणार, अनेक रेल्वे फेऱ्या रद्द

South Western and konkan Railway: सोनावळी ते दूधसागर दरम्यान बोगदा क्रमांक 15 जवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव ते लोंढा लोहमार्ग कोळसावाहू मालगाडीचे डबे घसरल्याने बंद पडला आहे. सोनावळी ते दूधसागर दरम्यान मालगाडीचे 15 डबे लोहमार्गावरून खाली उतरले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी येथील मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, लोंढा वास्को रेल्वे मार्गावर सोनावळी ते दूधसागर दरम्यान बोगदा क्रमांक 15 जवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना सकाळी 10.30 च्या सुमारास घडली यामुळे हा रेल्वेमार्ग रेल्वे वाहतूकीसाठी बंद झाला आहे.

या दुर्घटनेमुळे रेल्वे मार्ग पूर्णतः खराब झाला असून दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे.

अनेक रेल्वेच्या फेऱ्या रद्द

सकाळी कोळसा वाहतूक करणारी मालगाडी रेल्वे कोळसा भरून कर्नाटकाच्या दिशेने जात होती. यावेळी 10.30 च्या सुमारास दूधसागर - सोनावळी दरम्यान बोगदा क्रमांक 15 जवळ ती रुळावरून घसरली.

त्यामुळे अनेक रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यशवंतपूर - वास्को रेल्वे रद्द करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT