Energy Conservation Awareness Dainik Gomantak
गोवा

Energy Conservation Awareness: ऊर्जा संवर्धनासाठी कोलवाळात चित्रकला स्पर्धा; विजेते करणार राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व

Kavya Powar

Energy Conservation Awareness: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऊर्जा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कोलवाळ येथे गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजिली. या स्पर्धेतील विजेते हे ११ डिसेंबर रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतील.

ऊर्जा मंत्रालयाने संपूर्ण देशात ऊर्जा संवर्धनावर वर्षभर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ज्यामध्ये शालेय स्तरावरील विद्यार्थी ऊर्जा संवधर्नावरील स्पर्धेत भाग घेतात. इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी (अ गट) आणि दुसर्‍या गटात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठा ही स्पर्धा दोन गटात आयोजिली होती.

यामद्ये १८९ शाळांमधील सुमारे २०हजार शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. दोन्ही गटात ३३२ विद्यार्थ्यांची चित्रकला निवडण्यात आली. आणि त्यानंतर मंगळवारी कोलवाळ येथील पॉवर ग्रिड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

अ गटात पहिले पारितोषिक दीप्ती वेळीप (शासकीय हायस्कूल पाडी केपे), दुसरे अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूलच्या साईश नाईक व तृतीय क्रमांक सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या हायस्कूलच्या अद्वैत देवळी याने पटकावला.

गट दुसर्‍यामध्ये श्री शांतदुर्गा हायस्कूल डिचोलीमधील वितेंद्र गोवेकर पहिला आला. तर दुसरे पारितोषिक बेथानी कॉन्व्हेंट हायस्कूलमधील जॉय सिल्वा व सेंट मायकल कॉन्व्हेंट हायस्कूल हणजूणमधील हिया गवंडे हिने तिसरे पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, कार्यकारी संचालक पॉवर ग्रिड आलोक, विफ्रेड गोस, विवेक बेलोकर, हारा प्रसाद पाल, एसबीआर राव यांच्या उपस्थितीत विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिस रक्कम देण्यात आली. दोन्ही गटातील पहिल्या विजेत्याला ५०हजार, दुसर्‍याला ३०हजार रुपये व तिसर्‍या क्रमांकास २०हजार व इतरांना प्रत्येकी दहा ७५००रुपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT