High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Bombay High Court At Goa: गूड न्यूज! गोवा खंडपीठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार

राजभाषा संचलनालय करणार भाषांतर

Akshay Nirmale

Bombay High Court At Goa News: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार आहेत. त्यामुळे गोमंतकीयांना याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. यापुर्वी हे निकाल इंग्रजीसह मराठीतून उपलब्ध होत होते.

तथापि, कोकणी ही गोव्याची राजभाषा आहे. राज्य सरकार विविध मार्गांनी कोकणी भाषेचे संवर्धन, जतन करण्याचा प्रयत्न करत असते. त्यातून केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आता हायकोर्टाचे निकाल देखील कोकणी भाषेतून उपलब्ध केले जाणार आहेत.

गोवा राजभाषा संचलनालयाच्या सहकार्याने या निकालांचे कोकणी भाषेमध्ये भाषांतर केले जाणार आहे.

सर्वसामान्य गोवेकरांना याचा मोठा लाभ होणार आहे. कारण गोव्यात कोकणी भाषिकांची संख्या मोठी आहे. येथील बोलीभाषेत बहुसंख्य नागरीक कोकणीचाच वापर करतात. तसेच कोकणीच्या संवर्धन, जतनासाठी येथे प्रयत्न होत असतात.

सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषा भवन बांधणार असल्याचा पुनरूच्चार केला होता. तसेच प्राचीन दस्तऐवज कोकणीत भाषांतरीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, कोकणी भाषांतरकार मिळत नसल्यावरून त्यांनी खंतही व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT