International Women's Day केंद्र सरकारतर्फे महिला बचत गटाला (सेल्फ हेल्प ग्रुप) व्यवसाय करून आर्थिकरित्या आणखी बळकट होण्यासाठी 50 लाख रुपये देण्याची योजना आहे.
आमदार संकल्प आमोणकर आणि इतर मान्यवरांनी त्यासाठी माझ्याकडे प्रस्ताव पाठवावा त्या योजनेचा लाभ येथील महिला बचत गटाला करून देण्याचे मी सर्वांना आश्वासन देत असल्याचे भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले.
मुरगाव मतदारसंघात रविवारी (दि.26) सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या मुरगाव महिला मोर्चातर्फे आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच व्यासपीठावर गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुरगाव मतदारसंघातील 80 महिला बचत गटांना (सेल्फ हेल्प ग्रुप) प्रशस्तिपत्र देण्यात आली. महिला बचत गटात असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी गोवा सरकारतर्फे विविध कामे (शिवण, स्वयंपाक, मेकअप इत्यादी) दिली जातात. ह्या गटातील महिलांनी भविष्यात आपल्या कुटुंबासाठी आणखी पैसा कमवायला पाहिजे.
केंद्र सरकारच्या 'मीडियम स्केल' अंतर्गत महिला बचत गटांना 50 लाख रुपयांची निधी देण्याची योजना आहे. त्यापैकी 15 लाख रुपये अनुदान असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
भविष्यात येथील महिलांनी आणखी पैसा कमवावा यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेऊन त्याला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन तावडे यांनी दिले.
आमदार संकल्प आमोणकर, श्रद्धा आमोणकर, नरेंद्र सावईकर यांनी त्यासाठी प्रस्ताव पाठवावा असे ते म्हणाले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांना महिला सक्तीची पुरेपूर जाणीव आहे.
त्यांनी स्त्री- मातृशक्तीला एकत्रित आणल्याने त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे, असे गौरवोद्गार भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शेवटी काढले.
गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, मुरगाव मतदारसंघात 10 महिला सेल्फ हेल्प ग्रुप तयार झाल्याची माहिती दिली. त्यापैकी 8 जणांना प्रशस्तिपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले.
केंद्रातील आणि गोव्यातील भारतीय जनता पक्षाची खरी शक्ती जर कोण आहे, तर ती महिला असल्याचे तानावडे यांनी सांगून भाजप यांच्या हितासाठी सदैव उचित पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी नरेंद्र सावईकर आणि इतर मान्यवरांची भाषणे झाली. मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका शांती मांद्रेकर, रोहिणी परब आणि भावना भोसले याचा सत्कार करण्यात आला.यावेळी सांस्कृतीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.