Goa Vidyaprasarak Mandal Dainik Gomantak
गोवा

Goa Vidyaprasarak Mandal: ''राज्याच्या हितासाठी युवा पिढी घडवणे शिक्षकांच्या हाती''

गोवा घडवण्याची प्रक्रिया सर्व शिक्षण संस्थांमधून सुरू होणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

फोंडा: शिक्षकी पेशा हा काही सहा किंवा सात तासांचा पुस्तकी ज्ञान प्रदान करणारा नव्हे तर माणूस घडवण्याची प्रक्रिया शैक्षणिक संस्था व्हायला हवी, त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या देशाशी प्रामाणिक राहण्याची आज खरी गरज असल्याचे स्पष्ट मत दैनिक गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक यांनी व्यक्त केले. फोंड्यातील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या एकशे अकराव्या स्थापनादिनानिमित्त आज (रविवारी) आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजू नायक बोलत होते.

(Gomantak's editor in chief Raju Nayak address Goa Vidyaprasarak Mandal ponda)

राजू नायक म्हणाले की, विनाशाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेल्या गोव्याला वाचवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे. डॉ. दादा वैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एकशे अकरा वर्षापूर्वी शिक्षणाच्या संदर्भात विचार करून गोवा विद्याप्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली त्याचा उद्देश खरंच सफल झाला का? याचे आत्मपरीक्षण आज गोवा विद्याप्रसारक मंडळाशी संबंधित प्रत्येकाने करायला हवे.

आर्थिक सबलता, महिलांना स्वतंत्रता प्राप्त करून देताना स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला म्हणजे सक्षम गोव्याची निर्मिती आपण केली अशा प्रमात न राहता गोवा घडण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी. ही प्रक्रिया केवळ एकाच संस्थेतून नव्हे तर सर्व संस्थांमधून सुरू होणे गरजेचे आहे. आज गोव्यातील उद्योगधंदे गोमंतकीयांच्या हातातून निसटले आहेत.

शिक्षण संस्थाही या गोव्याबाहेरील बड्या कंपन्यांनी हाती घ्यायला सुरवात केल्यामुळे येत्या दहा वर्षांत पण कुठे असू, याचा विचार शिक्षकांनी करायला हवा, त्यासाठीच तर मूल्याधारित आणि माणूस घडवणारे शिक्षण देण्याची आज तीव्रता भासत असल्याचे राजू नायक यांनी सांगितले.

गोवा विद्याप्रसारक मंडळाकडे मानव संसाधन मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा लाभ करून घेताना विद्यार्थ्यांना घडवा, राज्याच्या हितासाठी कार्यरत राहणारी युवा पिढी घडवणे शिक्षकांच्या हाती आहे. शिक्षणाच्या नव्या बाजू नवीन तंत्र आत्मसात करताना एक नवीन युवा पिढी शिक्षकांनी घडवावी तशी अपेक्षा व्यक्त होत असल्याचे सांगून राजू नायक यांनी गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या स्थापनादिनास शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर, कार्यकारी समितीचे अध्यक्ष कृष्णा रोट्ये, सचिव जयंत मंडुरकर तसेच आल्मेदा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सांताना कुलासो आदी उपस्थित होत्या. समई प्रज्वलन व जीव्हीएमचे संस्थापक दादा वैद्य तसेच इतर मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT