Music Dainik Gomantak
गोवा

संगीत क्षेत्रात गोमंतकीयांनी इतिहास रचला: सुभाष शिरोडकर

'कलाकारांनी आपल्या कलेचे आणि गुणांचे चीज करून घेण्यासाठी गोव्याबाहेर जाऊन कठोर साधना करावी'

दैनिक गोमन्तक

बोरी: संगीताच्या क्षेत्रात गोमंतकातील प्रतिभावंतानी फार मोठा इतिहास रचला. वेळप्रसंगी हालअपेष्टा सोसून इथल्या कलाकारांनी इतरत्र जाऊन संगीताचे शास्त्रशुध्द ज्ञान मिळवले. संपूर्ण संगीत विश्‍वाला गायन वादन नृत्य नाट्य कलेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांना रिझवले. त्या महान कलाकारांची परंपरा राखण्याची जबाबदारी आत्ताच्या पिढीतील कलाकारांनी पेलली पाहिजे. कलाकारांनी आपल्या कलेचे आणि गुणांचे चीज करून घेण्यासाठी गोव्याबाहेर जाऊन कठोर साधना करावी, असे प्रतिपादन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

देऊळवाडा-बोरी येथील राघवेंद्र स्वामी सभागृहात प्रतिभा फ्रेंडस सर्कल या संस्थेने आपल्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखिल गोवा पातळीवरील नाट्यगीत गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून शिरोडकर बोलत होते.

2 रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर, उपाध्यक्ष विनोद पोकळे, पं. चेडो परवार, मिनानाथ उपाध्ये, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, परीक्षक धर्मानंद गोलतकर,दुर्गाकुमार नावती आदी उपस्थित होते.

जयंत मिरिंगकर यांनी स्वागत केले. परिचय मिलिंद देवारी यांनी केला. विनोद पोकळे यांनी प्रास्ताविक केले. मेघना देवारी यांनी सूत्रसंचालन केले. विश्र्वंभर उर्फ बाप्पा देवारी यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT