Pramod Sawant|Gomantak TV Engineering Excellence Award 2024 Dainik Gomantak
गोवा

अभियंता दिनी होणार प्रेरक,कुशल आणि कल्पक हातांचा सन्मान! ‘गोमन्तक टीव्ही इंजिनियर्स एक्सलन्स ॲवार्ड २०२४’ची घोषणा

Engineering Excellence Award 2024: अर्ज, प्रकल्‍प पाठविण्‍याची शेवटची तारीख ६ सप्‍टेंबर २०२४; कार्यक्रमात एकूण १६ पुरस्‍कार देण्‍यात येतील

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak TV Engineering Excellence Award

पणजी: गोव्याचा भक्कम पाया आणि नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या, समाजासाठी प्रेरक ठरणाऱ्या कुशल आणि कल्पक हातांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘गोमन्तक टीव्ही इंजिनियर्स एक्सलन्स ॲवार्ड २०२४’ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्याला गोवा सरकारचे सहकार्य लाभले असून, अभियंता दिनी म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वा. कुजिरा-सांताक्रुझ येथील मुष्‍टिफंड संस्थेच्या ‘इंडिशिला’ सभागृहात तो संपन्‍न होणार आहे.

प्रसिद्धी आणि मदतीची अपेक्षा न बाळगता व समाजाने प्रेरणा घ्यावी, असे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य अभियंते करत असतात. तसेच ते अंगभूत गुणांच्या बळावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता आपण या समाजाचे देणे लागतो, अशा कृतज्ञ जाणिवेतून ‘गोमन्तक टीव्ही’ने पडद्यामागील अभियंतारूपी कल्‍पक हातांचा सन्‍मान करण्‍याचे योजून एक आगळेवेगळे व्यासपीठ खुले केले आहे.

भरीव योगदानाप्रती कृतज्ञता

अभियांत्रिकी क्षेत्राचा सामाजिक विकासात मोठा वाटा आहे. अभियंत्‍यांमुळे भव्‍य दिव्‍य व शाश्‍‍वत विकास शक्‍य झाला आहे. समाजोत्‍थानात प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष भरीव योगदान देणाऱ्या या घटकाचे महत्त्‍व कुणीही विसरता नये. याच जाणिवेतून ‘गोमन्‍तक टीव्‍ही’ने अभियंत्‍यांना गौरवण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे नक्‍कीच सकारात्‍मक वातावरण अधिक वृद्धिंगत होईल.

कार्यक्रमात होणार १६ पुरस्‍कारांचे वितरण

या कार्यक्रमात एकूण १६ पुरस्‍कार देण्‍यात येतील. त्‍यात सार्वजनिक बांधकाम, वीज खाते व आयटी खात्‍यासाठी एकूण सात पुरस्‍कार देण्‍यात येणार आहेत. या कार्यक्रमामुळे गोव्‍यातील सरकारी खात्‍यांमध्‍ये मोठी उत्‍सुकता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे अभियंते मोठ्या प्रमाणात उपस्‍थित राहणार आहेत. सरकारी पातळीवर काम करणाऱ्या अभियंत्‍यांना खासगी प्रयत्नांतून पुरस्कार दिले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुरस्कार विभाग असे...

‘गोमन्तक इंजिनियर्स एक्सिलन्स ॲवार्ड २०२४’मध्‍ये विविध विभाग आहेत. उत्कृष्ट गोमंतकीय इंजिनियरिंग ब्रॅंड; अभियांत्रिकी महाविद्यालयांतर्फे गोव्यात राबविण्यात आलेला उत्कृष्ट प्रकल्प; जागतिक स्तरावरील उत्कृष्ट गोमंतकीय अभियंता; मनोहर पर्रीकर ऑलराऊंडर अभियंता; यूथ चॅलेंज; गोवन इंजिनियरिंग स्टार्टअप्‍स; उत्कृष्ट गोवन रिअर इस्टेट प्रोजक्ट; महिला अभियंता (१ सरकारी व १ खासगी); जीवनगौरव पुरस्कार; इंजिनिअर्स रोल इन इज्युकेशन; इंजिनियरिंग मायंड्स फॉर नॉन इंजिनियरिंग पर्सन ॲवार्ड असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी काही निकषही ठरविण्यात आले आहेत.

येथे साधा संपर्क

पुरस्कारांसंबंधी अधिक माहितीसाठी विवेक सरदेसाई : ९४२२०६४९३२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच gomantak.awards@dainikgomantak.com येथे ई-मेल पाठवावा.

‘गोमन्तक टीव्ही’च्या माध्यमातून पहिल्यांदाच ‘इंजिनियर एक्सेलन्स ॲवार्ड’ अभियंता दिनी आयोजित करण्‍यात येत आहे. अभियंते गुणवत्तापूर्ण कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडणे गरजेचे आहे. त्यामुळे शासकीय तसेच खासगी अभियंत्यांनी अर्ज करावेत. या सोहळ्याला माझ्या शुभेच्छा.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा राज्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT