Gomantak Karandak Gomantak Digital Team
गोवा

Gomantak Karandak : आज ‘गोमन्तक-करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विविध महाविद्यालये होणार सहभागी

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Karandak : गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने उद्या मंगळवारी (ता. ११) गोमंतक करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे.

तरुणांमध्ये एकांकिका तसेच मराठी भाषा रुजावी, त्यांना नाटकाची, कलेची गोडी लागावी, या उद्देशाने एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कला अकादमी नाट्य महाविद्यालय-पणजी, गणपत पार्सेकर महाविद्यालय-हरमल, फोंडा एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक महाविद्यालय-फर्मागुडी, ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय आणि संशोधन केंद्र-म्हापसा, संत सोयरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य महाविद्यालय-पेडणे आदी महाविद्यालय यात सहभागी होतील.

हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य आहे. नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ मान्यवरांची राहणार उपस्थिती

स्पर्धेचे उद्‍घाटन कला व संस्कृती विभागाचे संचालक सगुण वेळीप यांच्या हस्ते होऊन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची प्रमुख उपस्थिती राहिल.

सायंकाळी ५.३० वाजता बक्षीस समारंभ पार पडेल. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CRC Centre: केंद्रातर्फे गोव्यासाठी उभारले जाणार 40 कोटींचे 'सीआरसी' केंद्र, राज्यातील दिव्यांगांसाठीच्‍या विविध सुविधा येणार एकाच छताखाली

Monsoon: मान्सूनचे शेवटचे तीन दिवस उरले, पण पावसाची तूट कायम! राज्यात यंदा तब्बल 36.41 इंच कमी पाऊस, अवघ्‍या तीनच केंद्रांवर 'शतक'

VIDEO: कोहलीचा आक्रमक अवतार अन् गौतम गंभीरचे ते एक्सप्रेशन; कॅमेऱ्यात कैद झाला तो क्षण, सोशल मीडियावर मीम्सचा पूर!

Price Hike Alert: दिवाळीच्या सणाआधीच महागाईचा दणका! AC, TV, फ्रिज आणि वॉशिंग मशीन महागणार; ग्राहकांना वाढीव किंमत मोजावी लागणार

नोंदणी न केलेले होम स्टे, हॉटेल्सवर कारवाई अटळ! सरकारी महसूल बुडविणाऱ्यांची गय नाहीच, पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT