Gomantak Karandak  Gomantak Digital Team
गोवा

Gomantak Karandak : युवा कलाकारांना योग्य व्यासपीठाची गरज

ज्येष्ठ नाट्यकर्मी अजित केरकर : राज्यस्तरीय गोमन्तक करंडक एकांकिका स्पर्धेला मोठा प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Karandak : कलाकारांच्या अभिव्यक्तीचा विचार करताना युवा कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळायला हवे. ‘गोमन्तक’ने युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेला ‘राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशी भावना ज्येष्ठ नाट्यकर्मी अजित केरकर यांनी व्यक्त केली.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यीन) आयोजित ‘गोमन्तक करंडक’ राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरात आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी केरकर यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे उद्‍घाटन कला व संस्कृती विभागाचे संचालक सगुण वेळीप, कला मंदिराच्या सदस्य सचिव स्वाती दळवी यांच्या उपस्थितीत झाले. बक्षीस वितरण सोहळ्याला अजित केरकर, ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, दै. गोमन्तकचे मुख्य व्यवस्थापक (व्यवसाय प्रशासन) सचिन पोवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

‘दी स्केलिटन वुमन’चा दबदबा; द्वितीय - सावधान नो एंट्री

स्पर्धेत पणजीच्या कला अकादमी कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स यांच्या ‘दी स्केलिटन वुमन’ या एकांकिकाला प्रथम तर आसगाव-बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या ‘सावधान नो एंट्री’ या एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळाले. स्पर्धेचे परीक्षण नाट्यकर्मी संजय मापारी व नाट्यप्रशिक्षक साई कळंगुटकर यांनी केले.

प्रेक्षकांची दाद

गोमन्तक करंडक स्पर्धेदरम्यान फोर्थ वॉल थिएटरच्या ‘गडद निळ्या सावळ्या’ या प्रसिद्ध एकांकिकेचा विशेष प्रयोग सादर झाला. साईनंद वळवईकर आणि ममता शिरोडकर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली.

यांनी पटकाविली पारितोषिके

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : प्रसाद कळंगूटकर, द्वितीय शेफाली नाईक. उत्कृष्ट अभिनेता-वैभव कवळेकर, द्वितीय अमेय पाडेलकर. उत्कृष्ट अभिनेत्री-शेफाली नाईक, द्वितीय सावनी पणशीकर.

  • प्रकाशयोजना : साईनंद वळवईकर, द्वितीय प्रसाद कळंगूटकर. नेपथ्य-भूपेंद्र च्यारी, द्वितीय शिवम सांगोडकर. पार्श्‍वसंगीत-कौशल कवळेकर, द्वितीय प्रथमेश केरकर.

  • रंगभूषा : शशिकांत पवार, द्वितीय वोप्तेश नाईक. उत्कृष्ट वेशभूषा-प्रसाद कळंगूटकर. तर उत्कृष्ट लेखनासाठी प्रसाद कळंगूटकर यांना पुरस्कार देण्यात आला.

राज्याची समृद्धी महत्त्वाची

गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक म्हणाले की, कलाकाराला राजकीय ज्ञानाची जाणीव असावी. त्यासाठी वर्तमानपत्रांचे सातत्याने वाचन आवश्‍यक आहे. नवीन गोवा निर्माण करताना राज्याच्या समृद्धीसाठी काय हवे आहे, याचा विचार युवावर्गाने करावा. कलेच्या माध्यमातून अशा चळवळी होणे शक्य आहे, त्यासाठी कलाकारांनीही पुढाकार घ्यावा.

सरकारने द्यावे प्रोत्साहन

राज्यातील कलेच्या क्षेत्रातील मोठी संस्था असलेल्या कला अकादमीने युवा वर्गाला प्रोत्साहन देणारी एकांकिका स्पर्धा बंद केली आहे. चार वर्षे ही स्पर्धाच झालेली नाही. त्याबद्दल नेत्यांनी, कलाकारांनी विचार करायला हवा, असे केरकर म्हणाले. कलाकारांच्या अभिनयाबद्दल, इतर प्रकारांबद्दलही त्यांनी नाट्यकलाकारांना मार्गदर्शन करत उत्कृष्ट सादरीकरणाचा हव्यास धरा, असे आवाहन केले.

तरुणांनी कलेची आवड अधिकाधिक जोपासली पाहिजे. युवकांनी आपला वेळ सकारात्मक ठिकाणी लावायला हवा. विविध समूहांच्या माध्यमातून एक सुजाण नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. युवकांमधील कलागुण वाढीस लागण्यासाठी त्यांना विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करायला हवेत. ‘यीन’चे उपक्रम युवकांच्या हिताचे आणि एकत्रिकरणाचे असतात.

सगुण वेळीप, संचालक, कला आणि संस्कृती संचलनालय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

SCROLL FOR NEXT