Goa Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: भरघोस व्याजाच्या आमिषाने दाम्पत्याला 16 लाखांचा गंडा, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Fraud: भरघोस व्याज देण्याच्या आमिषावर एका दाम्पत्याची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: भरघोस व्याज देण्याच्या आमिषावर एका दाम्पत्याची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मडकई औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी घडली आहे.

राजदीप गायकवाड याने यासंंबंधीची तक्रार म्हार्दोळ पोलिस स्थानकात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार गेल्या ३० जून २०२२ ते १५ मार्च २०२३ या कालावधीत ‘गोल्डलाईफ’ डिस्ट्रीब्युटर्सशी संबंधित असलेले इंद्रजीत कदम, अमेय कदम, स्मिता कदम, शैलेश वाघ, राहुल गडवे आणि रुपाली गडवे सर्व कोल्हापूर येथील आहेत.

ऱ्यांनी राजदीप गायकवाड व त्याच्या पत्नीशी संपर्क साधून गोल्डलाईफच्या खास योजनेसंंबंधीचे आमिष दाखवले. त्यात एक लाख रुपये दोन वर्षांसाठी गुंतवल्यास दरमहा साडेचार हजारांचे व्याज मिळेल, असे सांगितल्याने गायकवाड दाम्पत्याने सोळा लाख रुपये विविध बँक खात्यांतून ‘गोल्डलाईफ’च्या योजनेत गुंतवले.

गुंतवलेली रक्कम देण्यास टाळाटाळ

सोळा लाख रुपये गुंतवल्यानंतर केवळ २ लाख ६ हजार ५८२ रुपये तेवढे व्याज गायकवाड दाम्पत्याला देण्यात आले. मात्र, संशयितांकडून मूळ मुद्दलाची सोळा लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने अखेर राजदीप गायकवाड याने गोल्डलाईफ आस्थापनाशी संबंधित सहाही जणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार म्हार्दोळ पोलिसांनी संशयितांविरुद्द गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT