DRI seized 1.3 kilogram gold at Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: अंगावरच्या कपड्यात लपवले 66 लाख रूपयांचे सोने; मोपा विमानतळावरून तस्करीचा प्रयत्न उघड

अबुधाबीहून आलेल्या प्रवाशाकडून 1.3 किलो सोने जप्त; चांदीचा लेप देऊन तस्करीचा प्रयत्न

Akshay Nirmale

DRI seized 1.3 kilogram gold at Mopa Airport: उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेकायदेशीर सोने बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून सुमारे 66 लाख रूपयांचे 1.3 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मंगळवारी ही कारवाई केली.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गोवा प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार लालचंद नावाचा एक प्रवासी सोमवारी अबुधाबीहून गोव्याला इंडिगोच्या फ्लाइटमधून येत होता.

तो सोन्याची तस्करी करत होता. हे विमान सकाळी 9 वाजता मोपा विमानतळावर येणार होते.

त्याच्या सामानाची झडती घेतली असता काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर त्याची वैयक्तिक तपासणी करण्यात आली.

यात लालचंदने परिधान केलेल्या पँटची पाहणी केली असता, त्याचे कपडे नेहमीपेक्षा जड असल्याचे दिसून आले. एक्स-रे मशिनद्वारे तपासणी केली असता कपड्यांमध्ये पेस्ट स्वरूपात सोने लपविल्याचे उघड झाले.

पुढे, त्याची आणखी तपासणी केल्यावर एक सोन्याची अंगठी आणि एक सोन्याची बांगडी देखील सापडली. त्यावर चांदिचा लेप लावला होता.

अलीकडच्याच काळात डीआरआयने सोन्याच्या तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता आणि 5.7 किलो सोने आणि 28 आयफोन 15 प्रो मॅक्स स्मार्ट फोन जप्त केले होते. या प्रकरणी तीन जणांना अटकही केली होती. या मुद्देमालाची किंमत सुमारे 4 कोटी रुपये इतकी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT