Gold Theft Case 
गोवा

Gold Theft Case: दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास! दोघांना अटक

सोनसाखळी, दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Kavya Powar

Gold Theft Case: मागील काही दिवसात गोव्यात सोनसाखळी, दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र चोरल्याच्या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने जुने गोवेत एका महिलेचे 1.70 लाखांचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्रम भागात (37, दिल्ली), मोहम्मद फिरोज (31, बिहार) यांना ताब्यात घेतले आहे.

मागील अनेक दिवसांपासून परिसरात चोरांची ही टोळी सक्रिय असून लोकांची फसवणूक सुरू होती. दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने त्यांनी अनेकांची लुबाडणूक करत दागिने चोरल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलीस यासंबंधीत पुढील तपास करत आहेत.

इथे पहा चोरट्यांचा व्हिडिओ :

अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी कळंगुट किनाऱ्यावर घडली होती. यामध्ये कर्नाटकमधील पर्यटकाच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी चोरट्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून तुटलेल्या अवस्थेत सोन्याच्या चेन सापडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

Cooking Oil Recycling: हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या वापरलेल्या तेलाची डिजिटल नोंद होणार? गोवा सरकारला 18 महिन्यांचा आराखडा; प्रस्तावित नियम काय?

Supreme Court: 'धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नेमंक प्रकरण काय?

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT