Court Canva
गोवा

Goa Gold Theft Case: सोने चोरीप्रकरणाला कलाटणी, अटकपूर्व जामिनासाठी कॅसिनो चालकाची कोर्टात धाव; वाचा नेमंक प्रकरण?

Gold Theft Accused Files Anticipatory Bail: दवर्ली-नावेली येथील एका ऑनलाईन कॅसिनो चालवणाऱ्या व्‍यावसायिकाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ७२ लाख रुपयाचे सोने चोरी प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. आपल्याला अटक होईल, या भीतीने दवर्ली-नावेली येथील एका ऑनलाईन कॅसिनो चालवणाऱ्या व्‍यावसायिकाने सत्र न्यायालयात अटकपूर्व  जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जाला तक्रारदार  प्रीतेश लोटलीकर यांचे वकील अमेय प्रभुदेसाई यांनी हरकत घेऊन न्यायालयात अर्ज केला असून सोमवार २० जानेवारी रोजी न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. 

आनंद हरिजन याने हा जामिनासाठी अर्ज केला आहे. डिसेंबर महिन्यात बाणावली  येथील प्रीतेश लोटलीकर यांच्याकडे कामाला असलेल्या  मूळ पश्चिम बंगाल राज्यातील तीन कारागिरांनी लोटलीकर यांचे ७२ लाख रुपये किंमतीचे सोने चोरून नेले होते. कोंब मडगाव  येथे ही घटना घडली होती. ससुप्रोकाश  मोंडल, संजॉय मोंडल व तपस जना या संशयितांना नंतर मडगाव पोलिसांनी  कोलकाता येथून अटक (Arrested) केली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या ९५९ ग्रॅम सोन्यातील २०५ ग्रॅम सोने जप्त केले होते. संशयित सध्या जामिनावर आहे. पोलिस चौकशीत या संशयितांनी हरिजन यांचे नाव घेऊन त्याला सोने दिल्याचे सांगितले होते.

संशयितांनी दिले होते ३०० ग्रॅम सोने

ॲड. प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हरिजन हा ऑनलाईन कॅसिनो चालवत आहे. त्याला संशयितांनी ३०० ग्रॅम सोने दिले होते. त्यातील ७३ ग्रॅम सोने पोलिसांकडे दिले आहे. आम्हाला आमचे सोने परत मिळविण्यासाठी आम्ही या अटकपूर्व जामिनाला आव्हान दिले असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT