Gold Price Dainik Gomantak
गोवा

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

Latest Gold Silver Rate: मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सकाळी १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख १९ हजार ६४७ एवढा नोंदविण्यात आला.

Pramod Yadav

मुंबई: मौल्यवान धातू म्हणून ओळख असलेले सोनं आणि चांदी यांचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला स्पर्श करत आहेत. सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी किंचित वाढ झाली आहे.

मुंबईत १० ग्रॅम २४ कॅरेट सोनं १ लाख २१ हजार ५८० रुपये दराने विकले जात आहे. तर, एक किलो चांदीचा दर १ लाख ५० हजार ९०० रुपये एवढा आहे.

अमेरिका आणि चीन यांच्या व्यापर शीतयुद्ध सुरु असल्याने आंतरराष्ट्रीय बाजाराला फटका बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात सोने आणि चांदीचे दर वेगाने वाढत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सकाळी १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख १९ हजार ६४७ एवढा नोंदविण्यात आला. नऊच्या सुमारास त्यात ४०१ रुपयांची (०.३४%) वाढ झाली. तर, ९८९ रुपांच्या वाढीसह एक किलोग्रॅम चांदीची किंमत १ लाख ४५ हजार ३३१ रुपयांवर पोहोचले होती.

मुंबईतील सोने आणि चांदीचे दर

१० ग्रॅम २४ कॅरेट सोनं: १ लाख २१ हजार ५८० रुपये

१० ग्रॅम २२ कॅरेट सोनं: १ लाख ११ जार ४५० रुपये

एक किलो चांदी: १ लाख ५० हजार ९०० रुपये

(वरील जीएसटी आणि घडवणुकीचा भाव वगळून दिलेले आहेत.)

गोव्यातील सोनं, चांदीचे भाव

२४ कॅरेट – १२,१५८ रुपये प्रति ग्रॅम

२२ कॅरेट – ११,१४५ रुपये प्रति ग्रॅम

१८ कॅरेट – ९,११९ रुपये प्रति ग्रॅम

चांदी – १ लाख ५२ हजार प्रति किलो

पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव १२,१५८ रुपये, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ११,१४५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९,११९ रुपये प्रति ग्रॅम आहे.

तर, नागपूरमध्ये २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव १२,१५८ रुपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोनं ११,१४५ रुपये आणि १८ कॅरेट सोनं ९,११९ रुपये प्रति ग्रॅम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

SCROLL FOR NEXT