I-League Football Dainik Gomantak
गोवा

I-League Football: चर्चिल ब्रदर्सला पराभूत करत गोकुळम केरळने विजयाची संधी साधली

चर्चिल ब्रदर्सच्या किंग्सली फर्नांडिस याचा चुकलेला पास गोकुळम केरळासाठी फायदेशीर ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

गोकुळम केरळाने संधी साधली, तर चर्चिल ब्रदर्सला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेता आला नाही. पूर्वार्धात फर्षाद नूर याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर गतविजेत्या संघाने सामना 1-0 फरकाने जिंकून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली.

वास्को येथील टिळक मैदानावर रविवारी झालेल्या लढतीत नूर याने 20 व्या मिनिटास चेंडूला अचूक दिशा दाखविली. चर्चिल ब्रदर्सच्या किंग्सली फर्नांडिस याचा चुकलेला पास गोकुळम केरळासाठी फायदेशीर ठरला. पीएन नौफल याने चेंडू फर्षाद नूर याच्याकडे पास केला. यावेळी अफगाणिस्तानच्या खेळाडूने ताकदवान फटक्यावर गोलची नोंद केली.

गोकुळम केरळाने स्पर्धेतील नववा, तर सलग दुसरा विजय नोंदविला. त्यांचे 18 लढतीतून 30 गुण झाले आहेत. चर्चिल ब्रदर्सला सहावा पराभव पत्करावा लागला. 18 लढतीनंतर 26 गुणांसह ते पाचव्या स्थानी कायम राहिले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही गोकुळम केरळाने चर्चिल ब्रदर्सला एका गोलने हरविले होते.

अगोदरच्या लढतीत ट्राऊ संघाविरुद्ध 3-2 फरकाने पराभूत झालेल्या चर्चिल ब्रदर्सचा हा लागोपाठ दुसरा पराभव ठरला. गोकुळम केरळाने रविवारी पूर्वार्धात आघाडी घेतल्यानंतर माजी विजेत्यांनी बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. पाहुण्या संघाचा बचाव चर्चिल ब्रदर्सला भारी ठरला. एका गोलच्या निसटच्या आघाडीसह गोकुळम केरळाने गुणतक्त्यातील कामगिरी सुधारली.

इंज्युरी टाईममध्ये चौघांना यलो कार्ड

सामन्याच्या इंज्युरी टाईममधील खेळ तणावग्रस्त ठरला. या कालावधीत दोन्ही संघांतील प्रत्येकी दोघे मिळून एकूण चौघांना रेफरीने यलो कार्ड दाखविले. अगोदर 90+ 4 व्या मिनिटास गोकुळम केरळाचा जॉबी जस्टिन व चर्चिल ब्रदर्सचा वनलाल दुआत्सांगा यांना यलो कार्ड मिळाले. नंतर 90+7व्या मिनिटास यजमान संघाचा मोमो सिस्से व पाहुण्या संघातील पवन कुमार यांना यलो कार्ड दाखविण्यात आले.

श्रीनिदी डेक्कनचे अग्रस्थान अबाधित

आय-लीग स्पर्धेतील अग्रस्थान अबाधित राखताना हैदराबादच्या श्रीनिदी डेक्कनने रविवारी तळाच्या सुदेवा दिल्ली एफसीवर 3-1 फरकाने मात केली. त्यांचा 18 सामन्यांतील 13वा विजय ठरला. त्यामुळे सर्वाधिक 40 गुण झाले आहेत. पंजाब एफसी 37 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, मात्र ते एक सामना कमी खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT