Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! FDA ने सील केलेले गोदाम फोडले, जप्त केलेली केळी घेऊन मालक फरार

FDA Goa Action: गोदामाचा मालक सध्या एफडीएच्या ताब्यात असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला म्हापसा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Pramod Yadav

म्हापसा: गोवा अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने रासायनिक पद्धतीने पिकवलेली केळी ठेवलेल्या गोदामाला ०९ जून रोजी टाळे ठोकण्यात आले. गोदामातील केळी देखील जप्त करण्यात आली. पण, गोदामाच्या मालकाने २४ तासांतच एफडीएने लावलेले सील तोडून जप्त केळी घेऊन फरार झाला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गोदामाच्या मालकाला अटक केली आहे.

म्हापसा येथील गोदामात रासायनिक पद्धतीने केळी पिकवली जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. अधिकाऱ्यांनी गोदामावर धडक कारवाई करत केळी साठा जप्त करुन गोदामाला टाळे ठोकले. अन्न सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत एफडीएने ही कारवाई केली.

दरम्यान, २४ तासांत गोदामाच्या मालकाने सील तोडून गोदामातील केळी टेम्पोत भरुन फरार झाला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सतर्कतेने कारवाई करत मालकाला अटक केली. मालकाने केलेले कृत्य कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे.

गोदामाचा मालक सध्या एफडीएच्या ताब्यात असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला म्हापसा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT