Sindhudurg: वटपोर्णिमेला फणस काढण्यासाठी गेला अन् अस्वलाने हल्ला केला; दोडामार्ग येथे 49 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, उपचारासाठी गोव्यात दाखल

Wild Bear Attack In Sindhudurg: विष्णू यांचे अस्वलाकडे लक्ष गेले नाही आणि अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विष्णू गवड गंभीर जखमी झाले आहेत.
Wild Bear Attack In Dodamarg, Sindhudurg
Wild Bear Attack In SindhudurgDainik Gomantak
Published on
Updated on

दोडामार्ग: मांगेली, फणसवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अस्वलाने हल्ला केल्याने ४९ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. वटपोर्णिमेनिमित्त (१० जून) फणस काढण्यासाठी बागेत गेले असता ही घटना घडली. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी व्यक्तील बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विष्णू लाडू गवस (४९, रा. मांगेली, फणसवाडी) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वटपोर्णिमेच्या निमित्ताने विष्णू फणस काढण्यासाठी बागेत गेले होते. दरम्यान, फणसाच्या झाडाजवळच अस्वल फणस खात बसले होते. विष्णू यांचे अस्वलाकडे लक्ष गेले नाही आणि अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विष्णू गवड गंभीर जखमी झाले आहेत.

Wild Bear Attack In Dodamarg, Sindhudurg
Sindhudurg: काजू गोळा करायला गेला अन् हत्तीनं पायाखाली चिरडलं; सिंधुदुर्गात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

विष्णू यांनी आरडाओरडा केल्यानंतर अस्वलाने पळ काढला. दरम्यान, अस्वलाने केलेल्या हल्ल्यात विष्णू गंभीर जखमी झाले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या विष्णू यांना पहिल्यांदा दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर विष्णू यांना बांबोळी, गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Wild Bear Attack In Dodamarg, Sindhudurg
Sindhudurg: सिंधुदुर्गात धुडगूस घालणाऱ्या 'ओंकार' हत्तीला पकडण्यासाठी कर्नाटकातून येणार 'प्रशिक्षित हत्ती'

 काजू गोळा करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला हत्तीने पायाखाली चिरडले

काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला हत्तीने पायाखाली चिरडल्याची घटना दोडामार्ग येथे एप्रिलमध्ये घडली होती. लक्ष्मण गवस या ७० वर्षीय शेतकऱ्याचा यात मृत्यू झाला होता. हत्ती, अस्वल यासारख्या रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे दोडामार्ग येथील स्थानिक चिंतेत आहेत. हा उपद्रव रोखण्यासाठी आवश्यक उपयायोजन करण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com