Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत रंगला ‘गोड गोड बोला’ सांस्कृतिक महोत्सव; महिलांचा प्रचंड प्रतिसाद

Bicholim News : घडविले कलाविष्काराचे दर्शन; विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांची उपस्‍थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, नृत्याविष्कार आणि शेकडो महिलांच्या उपस्थितीत काल शनिवारी ‘गोड गोड बोला’ हा सांस्कृतिक महोत्सव डिचोलीत उत्साहात पार पडला.

डिचोली भाजप मंडळ आणि शिक्षा व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हळदीकुंकू’ संकल्पनेवर आधारीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील हिराबाई झांट्ये सभागृहात झालेल्‍या या महोत्सवाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दीड हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती.

राज्य महिला आयोग अध्यक्षा रंजिता पै प्रमुख पाहुण्या या नात्याने उपस्थित होत्या. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलित करून या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक ॲड. अपर्णा फोगेरी, नीलेश टोपले, भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्‍‍वास गावकर, डॉ. भाग्यश्री शेट्ये, ॲड. शुभा दीक्षित आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

नारीशक्ती महान : रंजिता पै

महिलांनी केवळ घरात बसून न राहता, पुढे यावे. एकमेकांशी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण करावी. नारीशक्ती महान आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका महत्वाची असते, असे मत प्रमुख पाहुण्या रंजिता पै यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षा व्हिजनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल आमदार डॉ. शेट्ये यांचे कौतुक केले.

डिचोलीचा विकास हे माझे ध्येय असून, एकमेकांच्या सहकार्यातून या ध्येयाची पूर्ती शक्य आहे. महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढे यावे.

- डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT