Asian Aquatics Championships 2024 
गोवा

Asian Aquatics Championships 2024: आशियाई शालेय जलतरणात गोव्याच्या विहानला दोन रौप्यपदकं

किशोर पेटकर

Asian Open Schools Invitational Aquatics Championships Bangkok 2024


थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या आशियाई खुल्या शालेय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना गोव्याच्या विहान पेडणेकर याने दोन रौप्यपदके जिंकली. तो साखळी येथील सेंट जॉन ऑफ द क्रॉस हायस्कूलचा विद्यार्थी आहे.

स्पर्धेत 29 देशांतील जलतरणपटूंनी भाग घेतला होता. भारताचे एकूण 61 जलतरणपटू सहभागी झाले होते. विहानने एकूण चार जलतरण शर्यतीत भाग घेतला. 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात त्याला दुसरा क्रमांक मिळाला. त्याने 2 मिनिटे 42.30 सेकंद वेळ नोंदविली.

मुलांच्या 4 बाय 50 मीटर रिलेतही त्याचा समावेश असलेल्या संघाला दुसरे स्थान मिळाले. याशिवाय विहानने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सहावा, तर 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत आठ क्रमांक मिळविला.

विहान हा गोव्याचा प्रतिभाशाली युवा जलतरणपटू असून राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करताना गतवर्षी रौप्यपदकाची कमाई केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT