Uma Talavalikar and Mangirish Salelkar Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या ‘उमंग’ची ऑस्ट्रेलियात भरारी

'ऑस्ट्रेलियात आमचे ग्राहक पूर्वीपासून असून तेथे भारतीय कौशल्याचा सन्मान होतो'

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात मुख्यालय असलेली 'उमंग सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस प्रा. लि.' ही कंपनी अमेरिकन सिलीकॉन व्हॅलीतील यशस्वी पदार्पणानंतर आता ऑस्ट्रेलियात आपले कार्यालय थाटणार आहे. उमा आणि मांगिरिश सालेलकर या गोमंतकीय दाम्पत्याचे अपत्य असलेल्या या कंपनीने अल्पावधीत घेतलेल्या गरुडभरारीचे तंत्रज्ञान क्षेत्रात कौतुक होत आहे.

गेली 12 वर्षे आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स, मरीन, औषधनिर्मिती, बांधकाम अशा विविध क्षेत्रांशी संबंधित माहिती तंत्रज्ञान शाखेतील प्रकल्प ‘उमंग’ हाताळत आहे.

डेस्कटॉप, वेब आणि मोबाईल अॅप्लिकेशन्स ही खासियत असलेल्या 'उमंग'ला आजवर औद्योगिक क्षेत्रात अनेक राष्ट्रीय पुरस्कार लाभले असून त्यात असोकेम आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा 2016 सालचा 'कस्टमर सेंट्रीक कंपनी ऑफ दी इयर' हा मानाचा पुरस्कारही आहे. 'नॅसकॉम'वर आपले अस्तित्व दर्शवणाऱ्या पहिल्या गोमंतकीय कंपन्यांत 'उमंग'चा समावेश होतो.

ऑस्ट्रेलियात आमचे ग्राहक पूर्वीपासून असून तेथे भारतीय कौशल्याचा सन्मान होतो. व्यवसाय विस्तारासाठी त्या देशात कार्यालय असणे अगत्याचे वाटल्याने आम्ही हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवसाय वृध्दी उपाध्यक्ष ऑस्कर रॉड्रिग्स यांनी दिली आहे.

मेलबर्न येथे 'उमंग'चे कार्यालय स्थापण्याविषयी मांगिरीश सालेलकर म्हणाले, गेली 12 वर्षे आम्ही 15 देशातील ग्राहकांचे समाधान केले आहे. गतवर्षी आम्ही आयटीची गंगोत्री असलेल्या सिलिकॉन व्हॅलीत कार्यालय थाटले. तेथे आम्हाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. ऑस्ट्रेलियातील ग्राहकांना आम्ही गेली 8 वर्षे सेवा देत असून त्यांचा विश्वास संपादित केला आहे. या कार्यालयाद्वारे मेलबर्न व क्विन्सलॅंड येथील ग्राहकांशी नाती दृढ होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT