Rohan Khaunte On Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक अवमानप्रकरणी पर्यटन मंत्री रोहन खंवटेंकडून सारवासारव; म्हणाले...

वादावर पांघरुण घालण्‍याचा प्रयत्‍न

दैनिक गोमन्तक डिजिटल

Rohan Khaunte on Shripad Naik: केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या दोना पावला जेटीच्या उद्‌घाटन समारंभातून वगळल्‍याने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक संतप्त झाले होते.

त्यांनी जाहीररित्या आपला राग व्यक्त केला होता. सोमवारी दिवसभर या प्रकरणावरून राज्यात उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या.

दरम्यान, राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी याबाबत आता सारवासारव केली आहे. खंवटे यांनी दिलगिरी व्यक्त करत ‘यापुढे असे होणार नाही, ही प्रशासनाची चूक होती आणि याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल, पर्यटन खात्याच्या या गंभीर चुकीसाठी मंत्री म्हणून मी त्यांची माफी मागतो,’ असे म्‍हणून या वादावर पांघरुण घालण्‍याचा प्रयत्‍न खंवटे यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी ‘स्वदेश दर्शन’ योजना राबविण्‍यात येत आहे.

त्‍याअंतर्गत राज्यातही अनेक प्रकल्प उभारण्‍यात आले आहेत. प्रामुख्याने विविध पर्यटनस्थळांचे नूतनीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्‍यासाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या योजनेतूनच दोना पावला जेटी विकसित करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्‍या या जेटीच्या उद्‌घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेतून दस्तुरखुद्द केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचेच नाव वगळल्याने ते भडकले होते. त्यांच्या समर्थकांनी सरकारला घरचा आहेर देत टीका केली होती.

उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी उघडपणे संताप व्यक्त केला होता. ‘ केंद्र सरकारने जर या प्रकल्पाला निधी दिला असेल तर केंद्राचा प्रतिनिधी उपस्थित असायलाच हवा! मी गोव्यात असो किंवा नसो; परंतु आपणास निमंत्रण का दिले नाही?

खासदाराला निमंत्रण न देणे हे शिष्‍टाचाराच्‍या कोणत्‍या तत्‍वात बसते, असा सवाल करीत या प्रकरणी मुख्यमंत्री सावंत व पर्यटनमंत्री खंवटे यांनी लक्ष घालावे, असे नाईक म्हणाले होते. एरवी संयत भूमिका घेणारे भाऊ आक्रमक झाल्‍याने अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या होत्या.

दरम्यान, या प्रकरणावरून इत पक्षांनीही टीका केली होती. प्रोटोकॉलनुसार राज्य सरकारच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना स्थानिक खासदाराला निमंत्रण दिले जाते. दोना पावला जेटीचे नूतनीकरण हे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या खात्‍यामार्फतच झाले आहे. त्यांना आमंत्रित करणे अगत्‍याचे होते, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

यापूर्वीही झुआरी पुलाच्या उद्‍घाटन प्रसंगीही नाईक यांना योग्य सन्मान न दिल्याच्या कारणावरून नाराजी नाट्य रंगले होते. तसेच इफ्‍फीच्‍या उद्घाटन सोहळ्यातही त्‍यांना यथोचित मान देण्‍यात आला नव्‍हता.

नाईक यांच्याकडे राज्य सरकार किंबहुना भाजपकडून कानाडोळा करण्याचा प्रकार सुरू आहे काय? अशी चर्चा त्यामुळे त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT