Goa Shigmotsav गोव्यातील उत्साहाचा आणि आनंदाचा सण असलेला शिगमोत्सव लवकरच सुरु होणार असल्याची माहिती गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिगमोत्सवाची सुरुवात ही फोंडा तालुक्यापासून होणार असून 8 मार्चला शिगमोत्सव होणार आहे. या पत्रकार परिषदेला मंत्री, आमदार सुभाष फळदेसाई, चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिगमोत्सवाची तारीख ठरवण्यासाठी याआधी सर्व शिगमोत्सव कमिटीसोबत बैठक झाली असल्याची माहिती यावेळी रोहन खंवटे यांनी दिली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीतून 8 मार्च ही तारीख ठरली असून फोंडा तालुक्यापासून शिगमोत्सवाला सुरुवात होणार आहे.
संस्कृती आणि परंपरा दाखवणारा हा सोहळा असून गोमंतकीयांच्या जिव्हाळ्याचा क्षण आहे. शिगमोत्सवामध्ये, धनगरी, शेतकरी अशा प्रकारची लोककला दाखवणारी नृत्य सादर होत असतात. गोव्याची ओळख दाखवणारी घोडेमोडणी हा कला प्रकारदेखील यात सादर केला जातो. तसेच पालखी नाचवणे, ढोलताशा पथकाचे वादन, रोंबट अशा सांस्कृतिक आणि कलात्मक गोष्टी पाहण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात दाखल होत असतात.
असा साजरा होणार शिगमोत्सव :-
9 मार्च कलंगुट,
10 मार्च साखळी आणि डिचोली
11 मार्च पणजी,
12 मार्च पर्वरी,
13 मार्च म्हापसा,
14 मार्च पेडणे वाळपई
15 मार्च सांगे
16 मार्च केपे आणि कुडचडे
17 मार्च वास्को
18 मार्च मडगाव
19 मार्च शिरोडा
20 मार्च कुकाळी
21 मार्च काणकोण
पणजीतील रस्त्यांची दुरावस्था पाहिल्यास येथे शिगमोत्सव कसा साजरा होई असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर खंवटे म्हणाले कि, येथील शिगमोत्सव मंडळे आणि पणजी पालिका यांनी एकत्र बसून मार्ग निश्चिती केली आहे. ते त्या प्रमाणे सादरीकरण करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.