सध्या गोव्यात म्हादई नदी या ज्वलंत विषय बनला आहे. म्हादईत झालेल्या कोणत्याही बदलांचा परिणाम झुवारीवरही निश्चितच होतो. त्यामुळे, पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने जे परिणाम म्हादईवर होतील, तेच परिणाम झुवारीवरही होणे क्रमप्राप्त आहे.
गोवेकरांसाठी म्हादई प्रश्न संवेदनशील बनला असतानाच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी "भाजपने दोन्ही राज्यांमधील दीर्घकाळचा म्हादईचा वाद मिटवला असून. म्हादईचे पाणी कर्नाटकला देवून येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्याचे काम केले आहे" असे विधान केल्यावर गोव्यातील वातावरण काहीसे तंग बनले होते.
मात्र गोवा मुख्यमंत्रांसह भाजपचे नेते म्हादई गोव्याची आहे आणि तिचे पाणी गोव्यालाच मिळणार असा सूर लावत आहेत. आज मडगाव येथे सहकार सोसायटीच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी जल संसाधन विकास खात्याचे मंत्री आणि सभागृह समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी म्हादई प्रकरणाचा निकाल गोव्याच्या बाजूनेच असेल असा विश्वास व्यक्त केलाय.
सुभाष शिरोडकर म्हणाले, म्हादई प्रकरणात गोव्याची बाजू अगदी भक्कम असून सर्वोच्च न्यायालयात ही केस येणार त्यावेळी तिचा निकाल गोव्याच्या बाजूनेच असेल. केंद्र सरकारच्या सर्व संबंधित खात्यांकडे आम्ही आमचा आक्षेप मांडला आहे.
म्हादईचे पाणी वळविण्यास आमचा सक्त विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयात 13 फेब्रुवारी रोजी हे प्रकरण येणार आहे. तिथे आमची बाजू मांडण्यासाठी आमच्या वकिलांनी सर्व तयारी केली आहे. सभागृह समितीची बैठक ठरल्या प्रमाणे 8 फेब्रुवारी रोजीच होणार आहे. त्या बैठकीत सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पुढील कृती ठरवली जाईल असेही त्यांनी सांगीतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.