Goa News | Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: लाँचनंतर काही तासातच PWD Goa अ‍ॅपवर नागरीकांकडून खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस

मंत्री निलेश काब्राल यांची माहिती; काम जमत नसल्यास इंजिनिअर्सनी राजीनामा द्यावा

Akshay Nirmale

Nilesh Cabral: राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील खड्ड्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी आणलेल्या PWD Goa या अ‍ॅपवर काही तासातच नागरीकांकडून तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. राज्यातील जवळपास 15 ठिकाणांहून 260 नागरीकांनी रस्त्यातील खड्ड्यांचे फोटोज या अ‍ॅपवर अपलोड केले आहेत, अशी माहिती सावर्जनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी दिली. गुरूवारी या अ‍ॅपचे अनावरण झाले होते.

मंत्री काब्राल म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी, कर्माचारी, कंत्राटदार या अ‍ॅपवर येणाऱ्या लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जबाबदार असतील. नवीन वर्षात या अ‍ॅपचा वापर नागरीकांना पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी, सांडपाण्याबाबतच्या तक्रारी, पाणी गळतीचे प्रकार यासाठीही करता येणार आहे. त्याचीही दखल खात्यातर्फे घेतली जाईल. याशिवाय लोकांना तक्रारीसाठी एक कायस्वरूपी दुरध्वनी क्रमांक उपलब्ध केला जाईल. अभियंत्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी 24 तास काम करावे, आणि शक्य नसल्यास राजीनामा द्यावा.

दरम्यान, नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते PWD Goa या अ‍ॅपचे अनावरण झाले होते. या अ‍ॅपद्वारे रस्त्यातील खड्ड्यांची समस्या मिटविण्यात येणार आहे. हे अ‍ॅप गोवेकरांना डाऊनलोड करावे लागेल.

गोवेकरांनी रस्त्यातील खड्ड्याचा फोटो या अ‍ॅपमध्ये अपलोड करावा लागेल. त्यानंतर संबंधित रस्त्याचा कंत्राटदार सर्व यंत्रणा कामाला लाऊन तो खड्डा मुजवेल आणि त्या मुजवलेल्या खड्ड्याचा फोटो त्याच अ‍ॅपमध्ये पुन्हा अपलोड करेल. त्यानंतर कंत्राटदाराने केलेल्या कामाचे मुल्यमापन इंजिनियरमार्फत करण्यात येईल. अशा रितीने रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT