Rice Threshing Dainik Gomantak
गोवा

Goa Rice Farming : परतीच्या 'पावसाचा' जोर वाढला तर..! शेतकरी चिंतेत; काही भागात भातमळणीला सुरूवात

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील काही भागात भाताच्या मळणीला सुरूवात झाली आहे. तर अनेक भाग असे आहेत जेथे अजून भाताची कणसे हिरवी आहेत. ताळगावात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरूवात केली होती.

जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात रोपणी करण्यात आली. पेरणी आणि रोपणी लवकर झाली, त्यामुळे जुलैमध्ये राज्यात जोरदार पावसाचा फटका जसा इतर भागातील भातशेतीला बसला तेवढा मोठा फटका लवकर पेरणी, रोपणी केलेल्या शेतकऱ्यांच्या भात शेतीला बसला नाही. परिणामी आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भाताची मळणी करून भात घरी नेले जाणार आहे. त्यामुळे जर पुढील काळात पाऊस पडला तरी या शेतकऱ्यांना काही भीती नाही.

अस्मानी संकट घोंगावतेय; शेतकरी चिंतेत

राज्यातील अनेक भागात परंपरागत भातशेती केली जाते. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात भात पेरणी करतात त्यामुळे रोपणी जुलै महिन्यात येते व सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कणसे येऊन नोव्हेंबरच्या शेवटी कुठे भात कापणी होते. यंदा जून महिन्यात भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जुलैमधील मोठ्या प्रमाणात बरसलेल्या पावसाचा फटका बसला.मोठ्या प्रमाणात भातशेती कुजली आणि त्यातून सावरलेल्या भातशेतीला आता कणसे धरली असून जर परतीच्या पावसाचा जर येत्या काळात जोर वाढला तर पुन्हा शेतीवर अस्मानी संकट सावट घोंगावेल,अशी भीती असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट काजू आणि बेकायदेशीर सिगारेट जप्त!

Goa Sunburn: सनबर्नच्या 100 कोटी मानहानीच्या दाव्यावर पार पडली सुनावणी; काय म्हणाले कोर्ट वाचा

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Digital Arrest पद्धतीने अहमदाबादच्या महिलेची पाच लाखांची फसवणूक; CBI अधिकारी असल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT