गोवा

गोव्यात शिक्षण संचालकाच्या पदावर वर्षभरात चौथ्यांदा बदल

नियुक्तीपूर्वी सावईकर हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सहसचिव म्हणून काम करत होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य नागरी सेवा अधिकारी भूषण के सावईकर (Bhushan K Savaikar) यांची गोवा (Goa) राज्य सरकारने सोमवारी तात्काळ प्रभावाने नवीन शिक्षण संचालक (education director) म्हणून नियुक्ती केली आहे. पूर्वीचे संचालक डी.आर.भगत 31 जुलै रोजी पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आत चौथ्यांदा गोव्यात शिक्षण संचालक पदावर नियुक्त करण्यात आली आहेत. शिक्षण संचालक म्हणून भगत आणि त्यांच्यापूर्वी संतोष आमोणकर, दोघांनीही काही महिने कार्यकाळ सांभाळल्यानंतर सावईकर यांची संचालक म्हणून नियुक्त केली आहे. (Goa's new education director is Bhushan K Savaikar)

आमोणकर यांच्या नियुक्तीपूर्वी आयएएस अधिकारी वंदना राव हे पद सांभाळत होत्या. परंतु एका वादग्रस्त परिपत्रकानंतर त्यांची बदली करण्यात आली, ज्याने अनुदानित शाळा व्यवस्थापनांना शिक्षकांचे वेतन त्यांच्या स्वतःच्या निधीतून देण्यास सांगितले कारण राज्याकडून मदत मिळण्यास विलंब होणार होता. त्यांच्या नियुक्तीपूर्वी सावईकर हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सहसचिव म्हणून काम करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT