Enforcement Directorate has seized shares held by Anil Salgaocar's family  Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! गोव्यातील साळगावकर कुटुंबियांच्या विविध कंपन्यांमधील हिस्सा ED कडून जप्त

साळगावकर यांच्याकडे 5,718 कोटी रुपयांची अघोषित विदेशी संपत्ती असल्याचा आरोप आहे.

Pramod Yadav

Enforcement Directorate has seized shares held by Anil Salgaocar's family: गोव्यातील खाण व्यापारी दिवंगत अनिल साळगावकर यांच्या विविध कंपन्यांमधील हिस्सा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जप्त केला. परकीय चलन कायद्यांतर्गत बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

साळगावकर यांच्याकडे 5,718 कोटी रुपयांची अघोषित विदेशी संपत्ती असल्याचा आरोप आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या निवेदनानुसार, परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) च्या कलम 37A(1) अंतर्गत जप्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाद्वारे, “दिवंगत अनिल साळगावकर यांची मालमत्ता हस्तांतरित केलेल्या सर्व 33 कंपन्यांमधील संपूर्ण शेअरहोल्डिंग जप्त करण्यात आली आहे. या कंपन्यांमधील शेअरहोल्डिंग 0.1 पासून 99.9 टक्क्यांपर्यंत आहे.

पनामा पेपर्स आणि पेंडोरा पेपर्स लीक प्रकरणाची दखल घेत साळगावकर यांच्या विरोधात तपास सुरू करण्यात आल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे. गोव्यातील रहिवासी असलेल्या अनिल वासुदेव साळगावकर यांच्यावर अनेक BVI (ब्रिटिश व्हर्जिन आयलंड) कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे.

साळगावकरांच्या पाच BVI कंपन्यांनी लोहखनिजाच्या व्यापारातून सुमारे 690, 650, 641 डॉलर (सुमारे 5,718 कोटी रुपये) चा नफा कमावल्याचा आरोप आहे, परंतु भारतीय अधिकाऱ्यांना याबाबत अद्याप जाहीर केले नाही. दरम्यान, अनिल साळगावकर यांचे 2016 मध्ये निधन झाले आहे.

आयकर विभागाने 2021 पासून साळगावकर कुटुंबातील लक्ष्मी साळगावकर व त्यांच्या चार मुलांना आतापर्यंत पाच वेळा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयकर खात्याकडून दोनच दिवसांपूर्वी ही चौकशी ईडीने हाती घेतली आहे.

गोव्यातील साळगावकर कुटुंबातील मातृसत्ताक लक्ष्मी साळगावकर व त्यांची मुले समीर, चंदना, पूर्णिमा व अर्जुन यांची विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) तरतुदींनुसार संशयास्पद परदेशातील व्यवहारांसाठी ही चौकशी केली जात आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AFC Champions League: FC Goa भिडणार रोनाल्डोच्या टीमशी! अल नस्सरविरुद्ध परतीचा सामना; सौदी अरेबियन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान

Edberg Pereira Assault: पोलिसांकडून मारहाण झालेल्‍या 'एडबर्ग'ची प्रकृती बिघडली! ICUत केले दाखल; प्रकरण क्राइम ब्रँचकडे सुपूर्द

C K Nayudu Trophy: 17 चौकार, 13 षटकार! 'शिवेंद्र'च्या तडाख्यामुळे गोवा सुस्थितीत; मेघालयाविरुद्ध 270 धावांची आघाडी

Goa Accident Death: भरधाव टँकर येऊन आदळला, कारचा चक्काचूर; दोघाजणांच्या अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात हळहळ

Goa Crime: अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी 'मास्टरमाईंड'ला 7 दिवसांची पोलिस कोठडी, संशयित बंगळूरुतून अटकेत; डिचोली पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT