Trajano D'Mello Dainik Gomantak
गोवा

TMC Goa: भाजपचा देश सुरक्षेचा दावा फोल, गोव्याची सागरीसुरक्षा धोक्यात; TMC चा आरोप

केंद्र व राज्य सरकारने 2009 च्या मुंबई हल्लावरून धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. असा टोला देखील डिमेलो यांनी लगावला.

Pramod Yadav

"भारतीय जनता पक्ष देशाच्या सुरक्षेचा दावा करते पण, हा दावा फोल असून गोव्याची सागरीसुरक्षा धोक्यात आहे. गोव्यात एकही सागरी पेट्रोलिंग बोट सक्रिय नाही. सरकारने पेट्रोलिंग बोट न पुरवल्याने राज्याची सागरीसुरक्षा धोक्यात आहे." असा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख ट्रोजन डिमेलो (Trajano D'Mello) यांनी केला. पणजी येथील शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डिमेलो बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याची सागरीसुरक्षेची दखल घेऊन याला केंद्रीय सुरक्षा खाते की राज्य सरकारला जबाबदार आहे, याचा खुलासा करावा असेही डिमेलो म्हणाले. केंद्रीय सरकारमध्ये सत्तेत असलेले भाजप सरकार देश सुरक्षेच्या मोठ्या बाता करतात. पण, गोव्याबाबत हा दावा फोल ठरतो. भारतीय नौदलाचा नुकताच राष्ट्रीय सागरी दक्षता अभ्यास पार पडला. त्यावेळी गोव्यातील सागरी पोलिसांकडे सक्रिय गस्त घालणाऱ्या बोट नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे डिमेल्लो म्हणाले. केंद्रीय सरकारने तात्काळ याकडे लक्ष द्यायला हवे अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे.

गोव्याकडे नऊ सागरी गस्त घालणाऱ्या बोट आहेत पण, एकही सक्रिय नाही. सरकारचे याकडे होणारे दुर्लेक्ष हे याचं मुख्य कारण आहे. राज्य सरकारने दहा मिनिटाच्या शपथविधीसाठी सहा कोटी रूपये खर्च केले. आणि भाजप मंत्र्यांचे निवासस्थान व मंत्रालयासाठी दहा कोटी रूपये खर्च केले आहेत. पण सरकारकडे सागरी गस्त घालणाऱ्या बोट दुरूस्तीसाठी पैसे नाहीत. असा आरोप ट्रोजन डिमेलो यांनी केला.

केंद्र व राज्य सरकारने 2009 च्या मुंबई हल्लावरून धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. असा टोला देखील डिमेलो यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT