Goa Mankurad Mango Dainik Gomantak
गोवा

Mankurad Mango In London: गोव्याचा ‘मानकुराद’ लंडनमध्‍ये खातोय ‘भाव’

Mankurad Mango In London: प्रथमच विदेशात निर्यात : सुमारे साडेसात हजार रुपये डझन; मिरचीही पाठवणार

गोमन्तक डिजिटल टीम

Mankurad Mango In London

गोमंतकीयांचा सर्वांत आवडता आंबा मानकुराद आज पहिल्यांदाच विक्रीसाठी परदेशात रवाना झाला. मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावरून के. बी. एक्सपोर्ट कंपनीद्वारे राज्यातून १ टन मानकुराद आंबे लंडनला नेण्यात आले.

दरम्‍यान, गोमंतकीय कृषी उत्पादनाच्या अनुषंगाने एका नव्या अध्यायाला सुरूवात होत असल्याचे कृषी संचालक नेव्‍हिल आल्फोन्सो यांनी सांगितले.

गोव्याच्या कृषी उद्योगाच्या अनुषंगाने ही एक महत्त्‍वपूर्ण घटना आहे. आपण केवळ आपल्याकडची वस्तू इंग्लंडला पाठवत नाही तर गोव्याचा समृद्ध वारसा, गोडवा जगासमोर नेत आहोत. मानकुराद आंब्याच्या निर्यातीमुळे नवीन बाजारपेठ खुली होईलच, शिवाय गोव्याच्या कृषी उत्पादनाला जागतिक स्तरावर मान्यताही प्राप्त होईल. शेतकऱ्यांच्या उत्पादनात त्‍यामुळे वाढ होणार आहे, असे आल्फोन्सो यांनी सांगितले.

पाच हजार हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली

मानकुराद आंबा हा त्याचा गोडवा, चव, रंग यासाठी ओळखला जातो. तो आमचा सांस्कृतिक वारसा आहे. राज्यातील ५ हजार हेक्टर क्षेत्रफळ आंबा लागवडीखाली असून राज्यात सुमारे २० हजार टन आंब्यांचे उत्पादन होते.

इंग्लंडमधील पहिल्या निर्यातीनंतर भविष्यात इतर गोमंतकीय पदार्थांची विशेषत: मिरचीची निर्यात करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आल्फोन्सो यांनी सांगितले.

गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद आंबा लंडनला पाठविण्यात आला असून, तेथे तो चांगला ‘भाव’ खात आहे. सुमारे तीन किलो वजनाचे डझनभर आंबे ७० पाउंड्स म्‍हणजे सुमारे साडेसात हजार रुपये दराने विकले जात आहेत. या आंब्यांना लिस्बनमध्ये अधिक मागणी आहे.

परंतु सध्या मानकुरादचा हंगाम संपत आल्याने पुढील वर्षी तेथेही मानकुराद आंबे निर्यात करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे के. बी. एक्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष प्रकाश खख्खर म्हणाले.

Edited By- गंगाराम आवणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT